Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची धुरा विराटच्या खांद्यावर; किंग कोहलीच्या नेतृत्वाखाली RCB होणार चॅंम्पियन?

IPL 2025 च्या मेगा लिलावापूर्वी सर्व संघ 31 ऑक्टोबर रोजी त्यांच्या खेळाडूंची कायम ठेवण्याची यादी प्रसिद्ध करणार आहे. RCB ची धुरा आता बंगळुरूच्या खांद्यावर असणार आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Oct 30, 2024 | 03:30 PM
IND vs ENG T-20 Match Virat has The Most Runs Jordan is Ahead in Wickets Take a Look at T20 Records of India and England

IND vs ENG T-20 Match Virat has The Most Runs Jordan is Ahead in Wickets Take a Look at T20 Records of India and England

Follow Us
Close
Follow Us:

Virat Kohli Likely to Lead RCB in IPL 2025 : IPL 2025 च्या मेगा लिलावापूर्वी सर्व संघ 31 ऑक्टोबर रोजी त्यांच्या खेळाडूंची कायम ठेवण्याची यादी प्रसिद्ध करणार आहेत. त्यानंतर या वर्षाच्या अखेरीस मेगा लिलाव होणार आहे. यावेळी अनेक मोठ्या खेळाडूंचे संघ बदलताना दिसतील, तर अनेक संघांचे कर्णधारही बदलू शकतात. यामध्ये RCB चा नवा कर्णधार किंग कोहली असणार आहे.
राहुल RCB च्या कॅम्पमध्ये जाणार
आता RCB संघाचा कर्णधारही बदलू शकतो. मेगा लिलावाद्वारे राहुल RCB च्या कॅम्पमध्ये जाईल आणि संघाचा पुढचा कर्णधार असेल, असे मानले जात होते. राहुलनेही RCB कडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण, आता विराट कोहली पुन्हा एकदा आरसीबीचा कर्णधार बनू शकतो, असे मीडिया रिपोर्ट्स समोर येत आहेत. मात्र, फाफ डू प्लेसिस अनेक वर्षांपासून आरसीबीचे कर्णधारपद भूषवत आहे.
विराट कोहली होणार RCBचा कर्णधार
एका प्रसिद्ध वृत्तपत्रानुसार, विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे पुन्हा कर्णधारपद भूषवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत त्याने संघ व्यवस्थापनाकडे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र, या प्रकरणात किती तथ्य आहे हे कोणालाच माहिती नाही आणि RCB कडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. विराट कोहलीने दीर्घकाळ IPL मध्ये आरसीबीचे नेतृत्व केले आहे. कोहली 9 वर्षे RCB चा कर्णधार होता. मात्र, त्याच्या नेतृत्वाखाली संघाला विजेतेपद मिळविता आले नाही.
त्यानंतर फाफ डु प्लेसिसकडे होती कर्णधारपदाची धुरा
विराट कोहलीने 2021 मध्ये आरसीबीचे कर्णधारपद सोडले. त्यानंतर फाफ डु प्लेसिसला आरसीबीचा नवा कर्णधार बनवण्यात आले. फॅफ तीन वर्षांपासून आरसीबीचे कर्णधारपद सांभाळत आहे, पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी आरसीबी फॅफला सोडू शकते. त्यानंतर आरसीबीला नव्या कर्णधाराची गरज भासेल. अशा परिस्थितीत विराट कोहली पुन्हा एकदा आरसीबीचे कर्णधारपद भूषवण्याची शक्यता आहे.
विराटच्या कर्णधारपदाच्या विक्रमाबद्दल
जर आपण आयपीएलमधील विराटच्या कर्णधारपदाच्या विक्रमाबद्दल बोललो तर, त्याने 2013 च्या हंगामात कर्णधारपदाची जबाबदारी पूर्णपणे स्वीकारली होती. परंतु तो संघासाठी एकदाही विजेतेपद मिळवू शकला नाही. त्याच्या नेतृत्वाखाली, फ्रँचायझीने 2016 मध्ये केवळ एकदाच फायनल खेळली होती, जेथे सनरायझर्स हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला होता. कोहलीने एकूण 143 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले, त्यापैकी केवळ 66 सामन्यात संघ जिंकला आणि 70 सामन्यात पराभव झाला. शेवटच्या 3 हंगामांचा विचार करता, डुप्लेसिसच्या नेतृत्वाखाली संघ 2022 आणि 2024 मध्ये प्लेऑफमध्ये पोहोचला होता.

 

Web Title: Royal challengers bangalore on virats shoulders will rcb become champions under the leadership of king kohli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2024 | 03:30 PM

Topics:  

  • bcci
  • IPL 2025
  • KL. Rahul
  • RCB
  • Royal Challengers Bangalore

संबंधित बातम्या

BCCI जवानांच्या बलिदानापेक्षा वर आहे का? पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यावरुन आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला पत्राद्वारे सवाल 
1

BCCI जवानांच्या बलिदानापेक्षा वर आहे का? पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यावरुन आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला पत्राद्वारे सवाल 

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक
2

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  
3

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  

Asia cup 2025 : ‘ती त्याची चूक, आमची चूक नाही..’, श्रेयस अय्यरला आशिया कपमधून डावल्यावर मुख्य निवडकर्त्यांची मोठी प्रतिक्रिया
4

Asia cup 2025 : ‘ती त्याची चूक, आमची चूक नाही..’, श्रेयस अय्यरला आशिया कपमधून डावल्यावर मुख्य निवडकर्त्यांची मोठी प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.