Ruturaj Gaikwad: सध्या आयपीएलचा महासंग्राम सुरू आहे. आजपर्यंत एकूण 23 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आमने-सामने यनर आहेत. दरम्यान सीएसके संघातून एक वाईट बातमी समोर येत आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाड हा संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे.
कर्णधार ऋतुराज गायकवाड हा दुखापत झाल्याने पूर्ण स्पर्धा खेळू शकणार नाही. त्यामुळे आता चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी असणार आहे. उर्वरित सामन्यात धोनी संघाची धुरा सांभाळणार आहे,असे कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी सांगितले.
Stephen Fleming announcing MS Dhoni as the captain! 🦁 pic.twitter.com/UP7WbrGVVT
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 10, 2025
बातमी अपडेट होत आहे…
चेन्नईने पूर्ण केला पराभवाचा चौकार
पंजाब किंग्सच्या घरच्या मैदानावर पंजबाने चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केले आहे. पंजाबच्या संघाने चेन्नईला 18 धावांनी पराभूत केले आहे. आज आयपीएल २०२५ चा २२ वा सामना पीसीए न्यू इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. या पंजाब किंग्स या स्पर्धेमधील तिसरा विजय आहे तर पंजाब किंग्स या स्पर्धेचा तिसरा विजय आहे. आजच्या सामन्यांमध्ये प्रियांश आर्या याने संघासाठी कमालीची फलंदाजी केली, या युवा खेळाडूच्या जोरावर पंजाब किंगच्या संघाने २१९ धावांचे लक्ष्य चेन्नई सुपर किंग्ससमोर लक्ष्य उभे केले होते. त्याचबरोबर शशांक सिंह याने सुद्धा संघासाठी दमदार फलंदाजी केली.
चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने या सामन्यातही विशेष कामगिरी केली नाही. चेन्नईचे सलामीवीर फलंदाज डेव्हॉन कॉन्वे आणि रचिन रवींद्र चांगली सुरुवात करून दिली होती. संघासाठी डेव्हॉन कॉन्वे याने संघासाठी ४९ चेंडूंमध्ये ६९ धावा केल्या, त्यानंतर त्याला संघाने रिटायर आऊट करण्यात आले. रचिन रवींद्र याने या संघासाठी मोठी खेळी खेळली नाही त्याने या सामन्यात २३ चेंडूंमध्ये ३६ धावा केल्या. चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आणखी एकदा फेल ठरला. ऋतुराजने संघासाठी ३ चेंडू खेळले आणि १ धाव घेऊन लोकी फर्ग्युसन याने बाहेरचा रस्ता दाखवला.
CSK Vs PBKS: चेन्नईने पूर्ण केला पराभवाचा चौकार; पंजाबने 18 धावांनी जिंकला सामना
चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांची आज पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली आहे. खलील अहमदने संघासाठी २ विकेट्स घेतले तर मुकेश चौधरी याने संघासाठी १ विकेट घेतला. त्याचबरोबर रविचंद्रन अश्विनने संघासाठी २ विकेट्सची कमाई केली. पर्पल कॅप होल्डर नूर अहमदने संघासाठी १ विकेट घेतला.