Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SA vs NZ : न्यूझीलंडचा द. आफ्रिकेसमोर 362 धावांचा डोंगर; रचीन रवींद्रसह केन विल्यमसनची दमदार शतके.. 

न्यूझीलंडने रचीन रवींद्रसह केन विल्यमसनच्या शतकांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 362 धावांपर्यंत मजल मारली असून दक्षिण आफ्रिकेसमोर 363 धावांचे आव्हान उभे केले आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 05, 2025 | 07:18 PM
SA vs NZ: New Zealand's 362-run victory over South Africa; Kane Williamson and Rachin Ravindra hit impressive centuries.

SA vs NZ: New Zealand's 362-run victory over South Africa; Kane Williamson and Rachin Ravindra hit impressive centuries.

Follow Us
Close
Follow Us:

SA vs NZ : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा  दुसऱ्या सेमी फायनल सामना आज (5 मार्च) लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडने रचीन रवींद्रसह केन विल्यमसनच्या शतकांच्या जोरावर न्यूझीलंडने 362 धावांपर्यंत मजल मारली असून दक्षिण आफ्रिकेला अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी 363 धावांचे आव्हान पार करावे लागणार आहे.

कर्णधार मिचेल सँटनरचा  प्रथम फलंदाजीचा निर्णय रचीन रवींद्रसह केन विल्यमसन या जोडीने योग्य ठरवत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. रचीनने 108 तर विल्यमसनने 102 धावा केल्या. या दोघांच्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेने  धावांचे आव्हान दिले. द. आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीन आणि कसिगो रबडा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

रचिन रवींद्र आणि केन विल्यमसनची शतके..

चॅम्पियन्स ट्रॉफी सेमी फायनलच्या दुसऱ्या सामन्यात रचीन रवींद्रने शतकी खेळी केली आहे. त्याने 101 चेंडूमध्ये 108 धावा केल्या आहेत. त्याला कासिगो रबडाने आऊट केले. तर केन विल्यमसनने 94 चेंडूचा सामना करत 102 धावा केल्या आहेत. त्याला  विआन मुल्डरने माघारी पाठवले. तसेच सलामीला आलेला विल यंग मात्र लयीत दिसत असतानाच त्याला लुंगी एनगिडीने बाहेरचा रस्ता दाखवला.

डॅरिल मिशेलने फटकेबाजी करत 37 चेंडूमध्ये 49 धावांची खेळी केली.  त्याला लुंगी एनगिडीने तंबूत पाठविले. तर टॉम लॅथम रबडाच्या चेंडूवर स्वस्तात बाद झाला. त्याने केवळ 4 धावाच केल्या.  त्यांतर आलेला ग्लेन फिलिप्स 27 चेंडूमध्ये 49 धावांची ताबडतोब फलंदाजी करत नाबाद राहिला. तर मायकेल ब्रासवेलने   16 धावांची भर घातली आणि मिचेल सँटनर 2 धावा करत नाबाद राहीला. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीन सर्वाधिक 3 विकेट्स तर कसिगो रबडा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच विआन मुल्डरने एक विकेट्स घेतली. केशव महाराजला मात्र बळी टिपण्यात अपयश आले.

हेही वाचा : Rachin Ravindra Record: आफ्रिकेविरुद्ध शतक करत रचिनने केला ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड; सेमीफायनलमध्ये ‘किवी’ मजबूत स्थितीत

केन विल्यमसनने रचला इतिहास..

लाहोर मधील गद्दाफी स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात विल्यमसनला 27 धावांची गरज होती आणि केशव महाराजने टाकलेल्या सामन्याच्या 19 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर एक धाव पूर्ण करत त्याने हा इतिहास रचला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 19000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा विल्यमसन हा क्रिकेट जगातील 16 वा फलंदाज ठरला आहे. केन विल्यमसनने आपल्या 384व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात आणि 440व्या डावात 19 हजार धावांचा आकडा गाठला आहे.

हेही वाचा : IND vs AUS: ‘मी मारत होतो ना..’; शतक पूर्ण न करू शकलेल्या विराटसाठी KL Rahul नाराज; मैदानातच दिली अशी प्रतिक्रिया की..; बघा video

संघांचे प्लेइंग-11 पहा

दक्षिण आफ्रिकेचे प्लेइंग इलेव्हन

रायन रिकेल्टन, टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, एडन मार्कराम, विआन मुल्डर, मार्को जॉन्सन, केशव महाराज, केशवजी महाराज, लुंगी एनगिडी

न्यूझीलंडची प्लेईंग इलेव्हन

विल यंग, ​​रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (क), मॅट हेन्री, काइल जेमिसन, मायकेल ब्रासवेल

 

Web Title: Sa vs nz new zealand set south africa a target of 362 run icc champion trophy 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2025 | 06:23 PM

Topics:  

  • Champion Trophy 2025
  • Champions Trophy 2025
  • ICC
  • kane williamson
  • Lahore
  • pakistan
  • Rachin Ravindra

संबंधित बातम्या

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?
1

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’
2

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’

Hangor Submarine : चीनकडून पाकिस्तानला मिळाली हँगोर पाणबुडी; हिंदी महासागरातील सागरी समीकरणात मोठा बदल
3

Hangor Submarine : चीनकडून पाकिस्तानला मिळाली हँगोर पाणबुडी; हिंदी महासागरातील सागरी समीकरणात मोठा बदल

Pakistan Flood : पाकिस्तानात मुसळधार पाऊस आणि पुराचा कहर; ४८ तासांत मृतांची संख्या २०० पार
4

Pakistan Flood : पाकिस्तानात मुसळधार पाऊस आणि पुराचा कहर; ४८ तासांत मृतांची संख्या २०० पार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.