रचिन रवींद्रने लगावले शानदार शतक (फोटो- सोशल मिडिया )
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज दुसरा सेमी फायनलचा सामना होत आहे. साऊथ आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरा सामना खेळला जात आहे. यात जो संघ जिंकेल तो संघ 9 तारखेला भारताविरुद्ध फायनल खेळणार आहे. मात्र आजच्या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये डावखुरा फलंदाज रचीन रवींद्रने शतकी खेळी केली आहे. शतकी खेळी करून त्याने एक नवीन वर्ल्ड रेकॉर्ड देखील रचला आहे.
साऊथ आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या सेमी फायनलच्या सामन्यात रचीन रवींद्रने शानदार शतक लगावले आहे. आजचा सामना लाहोर येथे खेळवला जात आहे. रचीन रवींद्रने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपले दुसरे शतक लगावले आहे. हे शतक करून क्रिकेटच्या इतिहासात त्याने आपले नाव कोरले आहे.
रचीन रवींद्रने या स्पर्धेत दोन शकते लगावून रेकॉर्ड केला आहे. रचीन रवींद्र चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात दोन शतके करणार पहिला खेळाडू ठरला आहे. तसेच रचीनने आयसीसी स्पर्धेत एकूण 5 शतके लगावली आहेत. रचीनने एकूण 13 डावात 5 शतके लगावली आहेत. त्याने त्याच्या करियरमध्ये एकूण 5 शतके केली आहेत. ती 5 ही शतके त्यांनी आयसीसी स्पर्धेत केली आहेत.
Fifth 💯 in ICC tournaments for Rachin Ravindra 🔥#SAvNZ ✍️: https://t.co/dGzPWxoavO pic.twitter.com/4Aoqi9R3ff
— ICC (@ICC) March 5, 2025
बातमी अपडेट होत आहे…