Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

DSP Trophy Cricket: ‘डीएसपी करंडक’ स्पर्धेत रंगला थरार! पुणे क्रिकेट क्लब अन् सार्क अकादमीची आगेकूच

Cricket News: साईराज निश्चितने ५७ चेंडूंत नऊ चौकारांसह ५० धावांची खेळी केली. अवधूत कानडेने ४० चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने ४० धावा केल्या, तर राजवीर चोरगेने ३३ धावांचे योगदान दिले

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 31, 2026 | 08:06 PM
pune cricket club

pune cricket club

Follow Us
Follow Us:
  • डीएसपी करंडक क्रिकेट स्पर्धेत पुणे क्रिकेट क्लबची विजयी आगेकूच
  • सार्कचा मिडासवर चार गडी राखून विजय
  • पुणे क्रिकेट क्लबची पुना क्लबवर १४३ धावांनी मात
पुणे: डीएसपी स्पोर्ट्स अँड इव्हेंट्सच्या वतीने आयोजितपहिल्या डीएसपी करंडक १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेतसाखळी फेरीत सार्क क्रिकेट अकादमी आणि पुणे क्रिकेट क्लब या संघांनी दमदार कामगिरी करत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी आगेकूच केली.वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लबच्या मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात शिवराज नागवडे याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर सार्क क्रिकेट अकादमीने मिडास क्रिकेट अकादमीचाचार गडी राखूनपराभव केला. शिवराजने ३४ धावा देत दोन गडी बाद केले. त्याच्या प्रभावी गोलंदाजीमुळे मिडासचा डाव १९१ धावांवर आटोपला.

मिडास क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना४३.४ षटकांत सर्वबाद १९१ धावाकेल्या. अभिनव मुंडेने ८५ चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीने ६२ धावा केल्या, तर सोहम बाबरने ७७ चेंडूंत सहा चौकारांसह ४९ धावांचे योगदान दिले. आदर्श पांडेने १८ धावा केल्या. सार्ककडूनआरुष पवार, अथर्व समर्थ आणि शिवराज नागवडेयांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.विजयासाठी १९२ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या सार्क क्रिकेट अकादमीने४२ षटकांत सहा गडी गमावून १९२ धावाकरत सामना जिंकला.

DSP Trophy Cricket: पुणेरी स्ट्रायकर्स आणि फिअरलेस फायटर्सची विजयी घौडदौड

साईराज निश्चितने ५७ चेंडूंत नऊ चौकारांसह ५० धावांची खेळी केली. अवधूत कानडेने ४० चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने ४० धावा केल्या, तर राजवीर चोरगेने ३३ धावांचे योगदान दिले. पार्थ पवार १७ धावांवर नाबाद राहिला. मिडासकडून अभिनव जी आणि पवन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.शिवराज नागवडेयाला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

सामन्यात हर्ष पाष्टेचे शतक

दुसऱ्या सामन्यात हर्ष पाष्टेच्या शानदार शतकी खेळीसह मितांशू मंडलच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पुणे क्रिकेट क्लबने पुना क्लबचा १४३ धावांनी पराभव केला.पुणे क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत आठ गडी गमावून २५० धावा केल्या. हर्ष पाष्टेने ११४ चेंडूंत १३ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने १२० धावांची दमदार खेळी केली. वेदांत शेळकेने ३१, तर अभिनव त्यागीने २९ धावांचे योगदान दिले.

DSP Trophy U-12 Cricket: इकोल स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि फँटम क्रिकेट अकादमीची विजयी आगेकूच

 

मितांशू मंडलची भेदक गोलंदाजी

ओमकार चव्हाण १४ धावांवर नाबाद राहिला. पुना क्लबकडून स्वराज बनसोडे आणि तुषार बांगर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.विजयासाठी २५१ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या पुना क्लबचा डाव ४४.२ षटकांत १०७ धावांत संपुष्टात आला. सचिन बोरा ३० धावांवर नाबाद राहिला, तर समर्थ जाधवने २३ आणि आर्यन सिंगने १० धावा केल्या. पुणे क्रिकेट क्लबकडून मितांशू मंडलने १० धावांत पाच गडी बाद करत पुना क्लबच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. राजू राऊतने तीन गडी बाद केले. मितांशू मंडल याला सामनावीर घोषित करण्यात आले.

Web Title: Saarc and pune cricket club continue their winning run in the dsp trophy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 08:06 PM

Topics:  

  • cricket news

संबंधित बातम्या

Cricket: अनुष्का वाईकरची अष्टपैलू कामगिरी; डिलीजंट क्रिकेट क्लबने स्पर्धेत उघडले विजयाचे खाते!
1

Cricket: अनुष्का वाईकरची अष्टपैलू कामगिरी; डिलीजंट क्रिकेट क्लबने स्पर्धेत उघडले विजयाचे खाते!

Nana Patekar: क्रिकेटशी होते जुने संबंध, संदीप पाटीलसह मैदानावर खेळूनही नानांनी का सोडले क्रिकेट
2

Nana Patekar: क्रिकेटशी होते जुने संबंध, संदीप पाटीलसह मैदानावर खेळूनही नानांनी का सोडले क्रिकेट

Cricket: ८० रन्सची तुफानी खेळी अन् सलग दुसरा विजय! ‘रायझिंग स्टार ब्ल्यू’ चा दणदणीत पराक्रम
3

Cricket: ८० रन्सची तुफानी खेळी अन् सलग दुसरा विजय! ‘रायझिंग स्टार ब्ल्यू’ चा दणदणीत पराक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.