Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: ‘शाब्बास अर्जुन!’ मुलाच्या शानदार पदार्पणानंतर सचिन तेंडुलकर भावुक; पोस्ट करत म्हणाला…

Sachin Tendulkar Emotional Post For Arjun: आयपीएल २०२६ च्या हंगामात अर्जुन तेंडुलकरने पंजाबविरुद्ध आपला पहिला सामना खेळला आणि महत्वाची विकेटही घेतली. यानंतर सचिन तेंडुलकरने अर्जुनसाठी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 24, 2026 | 01:51 PM
IPL 2026: ‘शाब्बास अर्जुन!’ मुलाच्या शानदार पदार्पणानंतर सचिन तेंडुलकर भावुक; पोस्ट करत म्हणाला…
Follow Us
Close
Follow Us:
  • अर्जुन तेंडुलकरचे IPL २०२६ मध्ये पदार्पण
  • सचिन तेंडुलकर भावुक
  • शेअर केली खास पोस्ट
अनेक वर्षांपासून मोठ्या मंचावर संधीची वाट पाहणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने आपल्या प्रभावी कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आयपीएल २०२६ च्या संपूर्ण हंगामात १३ सामन्यांसाठी बेंचवर बसल्यानंतर, अर्जुनला २३ मे रोजी पंजाब किंग्सविरुद्ध अखेर आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. लखनौ सुपर जायंट्सने सामना हरला असला तरी, अर्जुनने पंजाब किंग्सचा सलामीवीर प्रभसिमरन सिंगची विकेट घेऊन सर्वांना प्रभावित केले. २६ वर्षीय अर्जुनने चार ओव्हरमध्ये ३६ धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. वडील सचिन तेंडुलकर आपल्या मुलाच्या कामगिरीने भारावून गेले. सामन्यानंतर, सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करून आपला मुलगा अर्जुनचे कौतुक केले. यानंतर, ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

MI vs RR: करो किंवा मरो लढत! वानखेडेवर धावांचा पाऊस की गोलंदाजांचा कहर? जाणून घ्या पिच रिपोर्ट

सचिनने अर्जुनसाठी शेअर केली खास पोस्ट

सचिन तेंडुलकरने अर्जुनसाठी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. पोस्टमध्ये लिहिले की, ‘शाब्बास, अर्जुन’. ‘या हंगामात तू ज्या प्रकारे स्वतःला सांभाळले आहेस, त्याचा मला अभिमान आहे. तू नेहमी तुझ्या क्षमतेवर विश्वास ठेवला, संयम ठेवला, शांतपणे काम केलेस आणि शेवटच्या सामन्यापर्यंत तुझ्या संधीची वाट पाहूनही तू सकारात्मक राहिलास. क्रिकेट कौशल्याइतकीच संयमाचीही परीक्षा घेतो आणि आज तू या दोन्ही गोष्टी खूप चांगल्या प्रकारे हाताळल्या. जमिनीवर पाय ठेव आणि नेहमीप्रमाणेच खेळावर प्रेम करत राहा.’ सचिनची ही भावनिक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली.

Well done, Arjun. ❤️
Proud of the way you’ve carried yourself through this season, always believing in your ability, staying patient, working hard quietly, and remaining positive despite having to wait for your opportunity till the very last match.
Cricket tests patience as much… pic.twitter.com/3RdiGkXbfT
— Sachin Tendulkar (@sachin_rt) May 23, 2026

आयपीएल २०२६ मध्ये लखनौ सुपर जायंट्स संघ प्लेऑफच्या शर्यतीतून अधिकृतपणे बाहेर पडल्यानंतर, संघाने अर्जुन तेंडुलकरला त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात पदार्पणाची संधी दिली. अर्जुनने फलंदाजी करताना पाच चेंडूंमध्ये पाच धावा केल्या, पण त्याने आपल्या गोलंदाजीने अधिक प्रभावित केले. या डावखुरा वेगवान गोलंदाजाने चार ओव्हरमध्ये ३६ धावा देऊन एक विकेट घेतला. अर्जुनने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये प्रभसिमरन सिंगची विकेट घेतली असती, पण कर्णधार ऋषभ पंतने एक सोपा झेल सोडला. मात्र, अर्जुनने हार मानली नाही आणि आपल्या तिसऱ्या ओव्हरमध्ये एक अप्रतिम यॉर्कर टाकून प्रभसिमरन सिंगला पायचीत (LBW) केले.

श्रेयसचा शतक अन पंजाबचा विजय

शनिवारी (दि.२३) पंजाब किंग्सने आयपीएल २०२६ चा ६८ वा सामना जिंकला. ईकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सला ७ विकेट्सने पराभूत करून आपल्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. कर्णधार श्रेयस अय्यरने नाबाद शतक झळकावत पंजाब किंग्सच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या विजयामुळे पंजाब किंग्स सध्या १५ गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. संघाने १४ पैकी ७ सामने जिंकले असून, एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. पंजाबचे प्लेऑफमधील स्थान आता राजस्थान रॉयल्सवर अवलंबून आहे.

IPL 2026: मैदानावर विराट-हेड आमनेसामने! बाचाबाचीने तापलं वातावरण; ‘हँडशेक’ नाकारल्याचा Video Viral

Web Title: Sachin tendulkar emotional post for arjun tendulkar lsg vs pbks ipl 2026 news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 01:51 PM

Topics:  

  • Arjun Tendulkar
  • IPL 2026
  • Lucknow Super Giants
  • Punjab Kings
  • Sachin Tendulkar

संबंधित बातम्या

MI vs RR: करो किंवा मरो लढत! वानखेडेवर धावांचा पाऊस की गोलंदाजांचा कहर? जाणून घ्या पिच रिपोर्ट
1

MI vs RR: करो किंवा मरो लढत! वानखेडेवर धावांचा पाऊस की गोलंदाजांचा कहर? जाणून घ्या पिच रिपोर्ट

IPL 2026 मध्ये Shreyas Iyer ने केला राडा; ‘सरपंच’चे शानदार शतक; प्ले-ऑफची शर्यत कायम…
2

IPL 2026 मध्ये Shreyas Iyer ने केला राडा; ‘सरपंच’चे शानदार शतक; प्ले-ऑफची शर्यत कायम…

PBKS Vs LSG Live: जोश इंग्लिसने खडतर केला पंजाबचा प्ले ऑफचा मार्ग? ‘किंग्ज’ला 197 रन्सचे टार्गेट
3

PBKS Vs LSG Live: जोश इंग्लिसने खडतर केला पंजाबचा प्ले ऑफचा मार्ग? ‘किंग्ज’ला 197 रन्सचे टार्गेट

Rohit Sharma अन् इम्पॅक्ट प्लेयरचा नेमका विषय काय? मुंबई इंडियन्सच्या कोचने दिले ‘हे’ उत्तर; म्हणाले…
4

Rohit Sharma अन् इम्पॅक्ट प्लेयरचा नेमका विषय काय? मुंबई इंडियन्सच्या कोचने दिले ‘हे’ उत्तर; म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.