Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sachin Tendulkar ला अजून खेळायचं होतं पण एका फोन कॉलनं ODI करिअर संपवलं, BCCI च्या माजी मुख्य निवडकर्त्याचा मोठा खुलासा

'क्रिकेटचा देव' म्हणून ओळखला जाणारा जगातील महान फलंदाज सचिन तेंडुलकर. 22 डिसेंबर 2012 रोजी त्याने वनडे फॉरमॅटला अलविदा केला. एकदिवसीय क्रिकेट अजून खेळण्याची संधी त्याच्याजवळ उपलब्ध होती तरीही त्याने बायबाय का केलं?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 18, 2026 | 03:58 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सचिननं निवृत्त होऊन एक दशकाहून अधिक काळ
  • एकदिवसीय क्रिकेट अजून खेळण्याची संधी असतानाही निवृत्ती
  • संदीप पाटील यांचा मोठा खुलासा
Sachin Tendulkar wanted to play more : ‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखला जाणारा जगातील महान फलंदाज सचिन तेंडुलकर. ज्याने भारतातील प्रत्येक मुलाला क्रिकेटचं स्वप्न पाहायला शिकवलं. प्रत्येक मुलाला वाटायचं की आपण सचिन तेंडुलकरसारखं बनवं. अशा क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिननं निवृत्त होऊन एक दशकाहून अधिक काळ लोटला आहे. असे असूनही सचिनच्या नावावर अनेक विश्वविक्रम अबाधित आहेत.

Pakistani खेळाडूची खरेदी… ‘The Hundred’ ऑक्शनच्या वादानंतर ललित मोदींनी साधला Kavya Maranवर निशाणा, प्रकरण काय?

सचिनच्या नावे अजूनही विश्वविक्रम

टीम इंडियाला 2011 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकून देणाऱ्या सचिनने 90 आणि 2000 च्या दशकात भारताला एकदिवसीय क्रिकेटमध्ये मजबूत संघाची ओळख दिली. त्याने आपल्या कारकिर्दीतील शेवटचा एकदिवसीय सामना 18 मार्च 2012 रोजी आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळला. यानंतर 22 डिसेंबर 2012 रोजी त्याने वनडे फॉरमॅटला अलविदा केला. एकदिवसीय क्रिकेट अजून खेळण्याची संधी त्याच्याजवळ उपलब्ध होती तरीही त्याने बायबाय का केलं?

संदीप पाटील यांचा मोठा खुलासा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी मुख्य निवडकर्ता संदीप पाटील यांनी सचिनच्या वनडे क्रिकेटमधून निवृत्तीबाबत मोठा खुलासा केला आहे. 2013 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर ‘मास्टर ब्लास्टर’ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, परंतु बीसीसीआयने त्याला आधीच सांगितले होते की सचिन तेंडुलकरच्या जागेच्या बदलीचा शोध घेत आहेत. 2012 मध्ये सचिनने एकदिवसीय क्रिकेट सोडले आणि आंतरराष्ट्रीय टी-20 खेळणेही बंद केले. त्यावेळी सचिन फक्त कसोटी क्रिकेट खेळत होता.

पाटील यांनी सचिनला फोन करून काय विचारले?

माजी चीफ सिलेक्टर संदीप पाटील यांनी सचिनला फोन करून विचारले, ‘तुझा प्लॅन काय आहे?’ सचिनने उत्तर दिले, ‘का?’ पाटील यांनी सांगितले की, निवड समिती त्यांच्या बदलीचा शोध घेत आहे. हे ऐकून सचिन आश्चर्यचकित झाला.त्याने पुन्हा पाटील यांना कॉल केला आणि विचारलं की – तु खरंच सिरीयसली बोलतो आहेस का? पाटील म्हणाले, ‘हो.’ पाटील यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, ‘निवडकर्ते खेळाडूला वगळू शकतात, पण त्याची कारकीर्द संपली असे ते म्हणू शकत नाहीत. आम्ही सचिनला त्याच्या योजनांबद्दल विचारले. तो म्हणाला की त्याला खेळायचे आहे. आम्ही म्हटलं ठीक आहे.’ त्यानंतर सचिनने हा निर्णय घेतला.

MS DHONI 7 नंबर सोडणार? IPL 2026 मध्ये दिसणार नव्या नंबरच्या जर्सीमध्ये? ‘या’ पोस्टने उडवली खळबळ

Web Title: Sachin tendulkar wanted to play more but a phone call ended his odi career reveals former bcci chief selector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 03:58 PM

Topics:  

  • BCCI India
  • cricket
  • cricket marathi news
  • ICC ODI Ranking
  • Sachin Tendulkar

संबंधित बातम्या

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय
1

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय

Sachin Tendulkar company IPO: क्रिकेटच्या मैदानानंतर आता शेअर बाजारात चर्चा! सचिन तेंडुलकरच्या कंपनीचा 3,000 कोटी IPO
2

Sachin Tendulkar company IPO: क्रिकेटच्या मैदानानंतर आता शेअर बाजारात चर्चा! सचिन तेंडुलकरच्या कंपनीचा 3,000 कोटी IPO

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती
3

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत
4

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.