Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : वयाची शंभरी पार, पण कुस्तीचा तोच रुबाब! साहेबराव पवार यांच्या हस्ते हिंदकेसरी स्पर्धेचे मातीपूजन

Maharashtra Sports- साहेबराव पवार यांनी आयुष्यभर कुस्तीला जपले. स्वतःच्या सुख-दुःखाची पर्वा न करता गावोगावी आखाडे जिवंत ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पैलवान घडवले

  • By anuradha sagar
Updated On: May 11, 2026 | 12:23 PM
Satara Wrestling, Kushti, Shahu Stadium, Maharashtra Sports

Satara Wrestling, Kushti, Shahu Stadium, Maharashtra Sports

Follow Us
Follow Us:
  • वयाच्या १०० व्या वर्षीही साहेबराव पवार (भाऊ) आजही पहाटे ४ वाजता तालमीत उपस्थित राहून नवीन मल्लांना मार्गदर्शन
  • १४ ते १७ मे दरम्यान होणाऱ्या मानाच्या ‘हिंदकेसरी’ स्पर्धेसाठी त्यांनी नारळ फोडून आखाड्याचे पूजन
  • दीपक साहेबराव पवार यांनी आपल्या वडिलांच्या कुस्तीवरील प्रेमाला पुढच्या पिढीपर्यंत नेण्याची जबाबदारी स्वीकारली
Satara Sports News:  आजच्या वेगवान काळात अनेक गोष्टी बदलल्या, पण साहेबराव पवार यांचे कुस्तीवरील प्रेम कधी बदलले नाही. आजही आखाड्यातील माती हातात घेतली की त्यांच्या डोळ्यांत वेगळीच चमक दिसते. वयाच्या शंभराव्या वर्षीही त्यांच्या चालण्यातला रुबाब, बोलण्यातला भारदस्तपणा आणि कुस्तीबद्दलची तळमळ पाहून अनेक तरुणही थक्क झाले. निमित्त होते १४ ते १७ मेदरम्यान छत्रपती. शाहू स्टेडियम, सातारा येथे रंगणाऱ्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेच्या मातीपूजन कार्यक्रमाचे.

शाहू स्टेडियमवर बुधवारी कुस्तीचा इतिहास चालताना दिसला. वयाची शंभरी पार केलेला हा तरुण ऐटीत आखाड्याकडे चालत आला. पांढरेशुभ्र मलमली धोतर, अंगात कडक परिटघडीचा नेहरू शर्ट, डोक्यावर गांधी टोपी आणि डोळ्यांत आजही लाल मातीच्या सेवेची धग दिसत होती.

आखाड्याजवळ पोहोचताच त्यांनी नारळ फोडला आणि उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. हा फक्त आखाडा पूजनाचा क्षण नव्हता, तर उपस्थितांनी कुस्ती महर्षी साहेबराव पवार (भाऊ) यांच्या लाल मातीशी असलेल्या इमानाला दिलेली ती सलामी होती.

MI vs RCB Live Score: भुवीच्या भेदकमाऱ्या पुढे मुंबईचे फलंदाज हतबल! RCB समोर १६७ धावांचे आव्हान; तिलक वर्माची ५७ धावांची खेळी

साहेबराव पवार यांनी आयुष्यभर कुस्तीला जपले. स्वतःच्या सुख-दुःखाची पर्वा न करता गावोगावी आखाडे जिवंत ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पैलवान घडवले. कित्येकदा पदरमोड करून कुस्ती स्पर्धा भरवल्या. लाल मातीची परंपरा टिकावी म्हणून त्यांनी आयुष्य झिजवले. त्यांच्यासाठी कुस्ती हा फक्त खेळ नसून ती त्यांची साधना आहे. त्यामुळे ते नियमित पहाटे चार वाजता सातारा तालिम संघावर उपस्थित राहून उदयोन्मुख मल्लांना मार्गदर्शन करतात.

“वडिलांनी आयुष्यभर लाल मातीची सेवा केली. कुस्ती हीच त्यांची पूजा आणि आखाडाच त्यांचे मंदिर राहिले आहे. वयाची शंभरी पूर्ण करूनही त्यांच्यातील उत्साह तरुणांना लाजवणारा आहे. त्यांच्या आशीर्वादातूनच हिंदकेसरी स्पर्धेचे आयोजन करण्याची प्रेरणा मिळाली. कुस्ती आणि मातीवरील त्यांचे प्रेम पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे, हीच आमची खरी जबाबदारी आहे.”
— दीपक साहेबराव पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य

Amravati Crime: अमरावतीत सेल्फीचा जीवघेणा मोह! तलावात बुडून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू; काय घडलं नेमकं?

“साहेबराव पवार भाऊ म्हणजे महाराष्ट्राच्या कुस्ती संस्कृतीचा जिवंत इतिहास आहेत. त्यांनी आयुष्यभर लाल मातीची सेवा करत अनेक पिढ्या घडवल्या. आखाड्याशी इमान राखत त्यांनी असंख्य मल्लांना ताकद, शिस्त आणि संस्कार दिले. आजच्या पिढीने त्यांच्याकडून जिद्द, मेहनत आणि मातीशी नाळ जोडून ठेवण्याची प्रेरणा घ्यावी. वयाची शंभरी पूर्ण करूनही त्यांच्यातील आखाड्यावरील प्रेम आणि उत्साह पाहिला की प्रत्येक कुस्तीप्रेमीचा उर अभिमानाने भरून येतो.”
— मोहननाना खोपडे, भारतीय कुस्ती माती शैली विभाग

 

 

Web Title: Sahebrao pawar satara wrestling kushti shahu stadium maharashtra sports

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 12:22 PM

Topics:  

  • Maharashtra Wrestling
  • Satara News
  • Sports News

संबंधित बातम्या

Satara News : दिव्यांगांच्या हातांनी भरले रस्त्याचे खड्डे; प्रशासनाला दिला  संवेदनशीलतेचा धडा !
1

Satara News : दिव्यांगांच्या हातांनी भरले रस्त्याचे खड्डे; प्रशासनाला दिला संवेदनशीलतेचा धडा !

Satara News : गणेश आगमन मिरवणुकीसाठी पाच तारखा निश्चित; पोलिस अधीक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय
2

Satara News : गणेश आगमन मिरवणुकीसाठी पाच तारखा निश्चित; पोलिस अधीक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय

म्हसवड येथे संत नामदेव महाराजांचा ६७६ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न
3

म्हसवड येथे संत नामदेव महाराजांचा ६७६ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न

मराठा आरक्षणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू; आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी कार्यवाहीला वेग
4

मराठा आरक्षणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू; आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी कार्यवाहीला वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.