Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

80 सेकंदांत पाकिस्तानचा खेळ खल्लास! संग्राम सिंगने आशियाई MMA किताबावर कोरले नाव

Sangram Singh Wins MMA Beat Pakistani Ali: भारताच्या संग्राम सिंगने आशियाई MMA चॅम्पियनशिप जिंकून इतिहास रचला. त्याने पाकिस्तनाच्या आबिद अलीचा पराभव करुन विजेतेपद पटाकावले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 20, 2026 | 01:28 PM
80 सेकंदांत पाकिस्तानचा खेळ खल्लास! संग्राम सिंगने आशियाई MMA किताबावर कोरले नाव
Follow Us
Follow Us:
  • संग्राम सिंगने आशियाई MMA किताबावर कोरले नाव
  • कुस्तीपासून MMA पर्यंतचा अजेय प्रवास
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा ध्वज फडकावला
भारताचा दिग्गज कुस्तीपटू आणि  मिक्स्ड मार्शल आर्ट्स (MMA) फायटर संग्राम सिंगने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा भारताला गौरव मिळवून दिला आहे. संग्रामने १९ जुलै रोजी मलेशिया येथील क्वालालंपूर येथे झालेल्या भारत – पाकिस्तान हायव्होटेज लढतीत पाकिस्तानच्या मोहम्मद आबिद अलीला अवघ्या १ मिनिट २० सेकंदात (८० सेकंदात) नॉकआउट करत प्रतिष्ठित ‘स्ट्राइक एशिया चॅम्पियनशिप’ जिंकली. संग्रामने सुरुवातीपासूनच लढतीवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले आणि पहिल्या फेरीतच जोरदार अटॅक करून आपल्या प्रतिस्पर्ध्याला सावरण्याची कोणतीही संधी दिली नाही. या विजयासह, त्याने प्रोफेशनल एमएमएमध्ये आपला अपराजित विक्रम कायम ठेवला आणि भारतीय मिक्स्ड मार्शल आर्ट्सच्या इतिहासात आणखी एका अविस्मरणीय कामगिरीची नोंद केली. या विजयासह तो आशियाई MMA चॅम्पियन बनणारा पहिला भारतीय ठरला आहे.

IND vs ENG Live: तिसऱ्या वनडे सामन्याआधी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी बांधली काळी पट्टी, मौनही पाळले; नेमकं कारण काय?

प्रतिस्पर्ध्याच्या ताकदीवर अचूक मात

लढत सुरू झाल्यानंतर अवघ्या ३० सेकंदांत संग्रामने योग्य संधी साधत प्रतिस्पर्ध्याच्या पायावर हल्ला केला. त्यांनी आबिद अली यांच्या घोट्याला घट्ट पकडून त्यांना बचावाची कोणतीही संधी दिली नाही. यानंतर त्याने प्रतिस्पर्ध्याला केजच्या मध्यभागी खेचत ‘चोक सबमिशन’चा प्रभावी डाव लावला. या पकडीतून सुटका अशक्य झाल्याने पाकिस्तानी खेळाडूला अखेर पराभव स्वीकारत ‘टॅप आऊट’ करावे लागले. प्रशिक्षकांच्या मते, अर्जेंटिनामधील मागील MMA सामन्यातही संग्राम यांनी असाच लेग-अटॅकचा डाव यशस्वीपणे वापरला होता.

संग्राम यांचे प्रशिक्षक भूपेश कुमार यांनी सांगितले की, ‘मोहम्मद आबिद अली यांच्याकडे दमदार पंच, उंची आणि लांब रीचचा मोठा फायदा होता. सामन्याच्या सुरुवातीलाच संग्राम यांच्या डोळ्याजवळ एक जोरदार पंच बसला. तरीही त्यांनी संयम राखला आणि अनावश्यक पंचांच्या देवाणघेवाणीमध्ये अडकण्याऐवजी आपल्या जागतिक दर्जाच्या ग्रॅपलिंग कौशल्यावर भर दिला.’

हा विजय देशवासियांना आणि तिरंग्याला समर्पित

चॅम्पियन बनल्यानंतर, संग्राम सिंगने आपला विजय भारताच्या १.४ अब्ज नागरिकांना समर्पित केला. तो म्हणाला की, ‘हा विजय माझ्या देशाच्या, भारताच्या १.४ अब्ज नागरिकांना समर्पित आहे. जेव्हा जेव्हा मी रिंग किंवा केजमध्ये प्रवेश करतो, तेव्हा मी संपूर्ण राष्ट्राच्या आशा आणि तिरंग्याचा सन्मान सोबत घेऊन जातो. हे विजेतेपद भारतमातेला समर्पित आहे.’

भारत माता की जय’च्या घोषणांनी दुमदुमले स्टेडियम

मलेशियातील एरिनामध्ये संग्राम सिंह यांच्या विजयाची घोषणा होताच संपूर्ण वातावरण जल्लोषात न्हाऊन निघाले. त्यांच्या विजयानंतर प्रेक्षकांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी संपूर्ण स्टेडियम दुमदुमून टाकले. विजय मिळवल्यानंतर संग्रामने हा ऐतिहासिक किताब देशातील १४० कोटी भारतीयांना समर्पित केला. प्रत्येक वेळी रिंग किंवा केजमध्ये उतरताना भारताचा तिरंगा जागतिक मंचावर अभिमानाने फडकवणे हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.’

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा ध्वज फडकावला

संग्राम सिंगने यापूर्वी आंतरराष्ट्रीय एमएमए स्पर्धांमध्ये आपले कौशल्य सिद्ध केले आहे. त्याने पाकिस्तानचा अली रझा नासिर, ट्युनिशियाचा हकीम त्राबेल्सी आणि फ्रान्सचा फ्लोरियन कुडियर यांसारख्या लढवय्यांना पराभूत करून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला गौरव मिळवून दिला आहे.

कुस्तीपासून MMA पर्यंतचा अजेय प्रवास

कुस्तीच्या मैदानावर यशस्वी कारकीर्द घडवल्यानंतर संग्राम सिंगने MMA मध्ये प्रवेश केला आणि हा निर्णय त्यांच्यासाठी अत्यंत यशस्वी ठरला. MMA मधील हा त्यांचा सलग चौथा विजय असून तो अद्याप अपराजित आहे. विशेष म्हणजे स्ट्राइक आशिया चॅम्पियन’ बनणे हा त्याच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आणि पाकिस्तानच्या खेळाडूवर मिळवलेला हा त्यांचा दुसरा विजय आहे. त्यामुळे कॉम्बॅट स्पोर्ट्समध्ये भारताचे यशस्वी प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंमध्ये त्यांचे स्थान अधिक भक्कम झाले आहे.

टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना! गौतम गंभीर नव्हे, VVS लक्ष्मण हेड कोचच्या भूमिकेत,नेमकं कारण काय?

Web Title: Sangram singh becomes first indian asian mma champion defeats pakistan mohammad abid ali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 01:28 PM

Topics:  

  • IND VS PAK
  • Wrestler

संबंधित बातम्या

भारताच्या लेकीनं मैदान मारलं! Hansika Lamba ने बुडापेस्टमध्ये फडकावला ‘तिरंगा’; कुस्तीत जिंकले रौप्य पदक
1

भारताच्या लेकीनं मैदान मारलं! Hansika Lamba ने बुडापेस्टमध्ये फडकावला ‘तिरंगा’; कुस्तीत जिंकले रौप्य पदक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.