वेस्ट इंडिज क्रिकेटचे महान खेळाडू सर गार्फिल्ड सोबर्स यांचे १७ जुलै रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी बीसीआयने सोशल मीडीयावर एक पोस्ट शेअर केली. पोस्टमध्ये लिहिले की, ‘शुक्रवारी सर गार्फिल्ड सोबर्स यांचे दुखद निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी टीम इंडियाने हातावर काळ्या पट्ट्या बांधल्या आहेत.’ क्रिकेटची मक्का म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर सामना सुरू होण्यापूर्वी एक मिनिटाचे मौन पाळण्यात आले. यावेळी दोन्ही संघांचे खेळाडू आणि मैदानावर उपस्थित असलेले प्रेक्षक एकत्र उभे राहून त्या महान क्रिकेटपटूला श्रद्धांजली वाहताना दिसले. यापूर्वी, भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने पारंपरिक घंटा वाजवून खेळाला सुरुवात केली.
#TeamIndia is wearing black armbands to pay tribute to West Indies legend Sir Garfield Sobers following his passing on Friday.#ENGvIND pic.twitter.com/cYXAWc40iT — BCCI (@BCCI) July 19, 2026
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह डाव्या गुडघ्याला सूज आल्यामुळे या महत्त्वपूर्ण सामन्यातून बाहेर झाला आहे. बीसीसीआयने माहिती दिली की, कार्डिफमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना जसप्रीत बुमराहच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. नाणेफेकीपूर्वी बुमराहची फिटनेस टेस्ट घेण्यात आली, परंतु तो ती पास होऊ शकला नाही. त्यामुळे बुमराहला या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे.
भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल, शिवम दुबे, गुरनूर ब्रार, प्रसिद्ध कृष्णा.
इंग्लंड: बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रुक (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), सॅम करन, विल जॅक्स, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, जोश टंग.
गोल्डन बूटची शर्यत रंगली! एम्बाप्पेचा FIFA विश्वचषकात जलवा; मेस्सीला मागे टाकत मोडला ‘हा’ विक्रम






