भारत आणि दक्षिण आफ्रिका कसोटी सामना(फोटो-सोशल मीडिया)
IND vs SA LIVE Score, Second Test, Day 1 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना खेळला गेला असून दूसरा सामना गुवाहाटी येथे खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर ६ बाद २४७ होता. दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या देवशी ने धावा केल्या तर भारताकडून कुलदीप यादवने ३ विकेट्स घेतल्या.
नाणेफेक जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने फलंदाजीचा निर्णय घेत एडेन मार्कराम आणि रायन रिकेल्टन यांच्या जोडीने चांगली सुरुवात केली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ८२ धावा जोडल्या, जसप्रीत बुमराने मार्करामला बाद करून ही भागीदारी फोडण्यात यश मिळवले. पुढच्याच षटकात कुलदीप यादवने रिकेल्टनला बाद करत दक्षिण आफ्रिकेला दूसरा झटका दिला. क्रीजवर असलेले दोन नवीन फलंदाज ट्रिस्टन स्टब्स आणि टेम्बा बावुमा यांनी संघाला सावरत तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची संघर्षपूर्ण भागीदारी रचली. परंतु, रवींद्र जडेजाने बावुमाला बाद करून ही भागीदारी मोडीत काढली. कर्णधार बावुमा ४१ धावांवर बाद माघारी परतला.
त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकन फलंदाजांना कोणतीही मोठी महत्त्वपूर्ण भागीदारी करण्याची संधी दिली नाही. स्टब्स त्याचे अर्धशतक करण्यापासून हुकला. त्याला कुलदीपने आपली शिकार बनवले. त्यानंतर कुलदीप यादवने मुल्डरला बाद केले. मोहम्मद सिराजने आफ्रिकन संघाचा सहावा बळी टिपताना टोनी डी झोर्झीला मागे झेलबाद केले.
पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा, कुलदीप यादवने भारताकडून सर्वाधिक तीन बळी घेतले होते, तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक बळी मिळवण्यात यश मिळवले. खेळ थांबला तेव्हा काइल व्हेरेन (१) आणि सेनुरन मुथुसामी (२५) नाबाद होते.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अॅशेस मालिका खेळवली जात असून या मालिकेतील पहिला सामाना पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात ट्रॅव्हिस हेडच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर ८ विकेट्सने विजय मिळवला. इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २०४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मिचेल स्टार्कचे १० विकेट्स आणि ट्रॅव्हिस हेडचं विक्रमी शतक व लबुशेनचं अर्धशतकाच्या जोरवार इंग्लंडवर सहज विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.






