Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“…त्यांच्यासाठी तो मोठी डोकेदुखी ठरणार”; Vaibhav Suryavanshi बाबत शुभमन गिलचे मोठे विधान

क्वालिफायर 2 मध्ये वैभव सूर्यवंशीने 96 रन्सची आक्रमक खेळी केली होती.  या खेळीनंतर गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने वैभवला "जगातील सध्याच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक" असे संबोधले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 30, 2026 | 10:10 PM
“…त्यांच्यासाठी तो मोठी डोकेदुखी ठरणार”; Vaibhav Suryavanshi बाबत शुभमन गिलचे मोठे विधान
Follow Us
Follow Us:

वैभव सूर्यवंशीबाबत शुभमन गिलचे भाष्य
आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा वैभवचा विक्रम 
31 मे रोजी शुभमन गिल अन रजत पाटीदार आमनेसामने 

IPL 2026: आयपीएल 2026 चा महासंग्राम संपत आला आहे. उद्या गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम सामना होणार आहे. क्वालिफायर 1 मध्ये गुजरातचा संघ पराभूत झाला होता. मात्र क्वालिफायर 2 मध्ये गुजरातने राजस्थानचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. राजस्थानकडून यंदा पूर्ण हंगामात वैभव सूर्यवंशीने शानदार कामगिरी केली आहे. वैभवच्या कामगिरीवर आता भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने प्रतिक्रिया दिली आहे.

क्वालिफायर 2 मध्ये शुभमन गिलच्या शतकी खेळीवर गुजरात टायटन्सने अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यापूर्वी गुजरात टायटन्सचा कर्णधार आणि भारतीय संघाचा स्टार फलंदाज शुभमन गिल याने राजस्थान रॉयल्सचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. क्वालिफायर 2 मध्ये वैभव सूर्यवंशीने 96 रन्सची आक्रमक खेळी केली होती.  या खेळीनंतर गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने वैभवला “जगातील सध्याच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक” असे संबोधले आहे.

काय म्हणाला शुभमन गिल?

कर्णधार शुभमन गिलने वैभव सूर्यवंशीचे कौतुक केले आहे. वैभव सूर्यवंशीसाठी यंदाचा हंगाम खरोखरच शानदार राहिला आहे. मी याधी कोणत्याही खेळाडूला अशा प्रकारे फलंदाजी करताना पाहिलेले नाही. सध्या तो टी-20 मध्ये सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक फलंदाज आहे. वैभवच्या हातांचा वेग इतर फलंदाजांच्या तुलनेत खूप जास्त आहे, ज्यामुळे तो वेगवान गोलंदाजांना सहज खेळू शकतो. तो तांत्रिकदृष्ट्या खूप सक्षम आहे. येणाऱ्या काळात वैभव ज्या संघाविरुद्ध खेळेल, त्यांच्यासाठी तो मोठी डोकेदुखी ठरणार आहे.

Vaibhav Sooryavanshi Reaction: मन तुटलं…हरल्यानंतर वैभवची पहिली भावूक प्रतिक्रिया, पहा वैभवची Insta Story

हरल्यानंतर वैभवची पहिली भावूक प्रतिक्रिया

मुल्लानपूर, न्यू चंदीगड येथे झालेल्या सामन्यातील पराभवानंतर, राजस्थान रॉयल्सने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक भावनिक संदेश शेअर केला. वैभव सूर्यवंशीनेही आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर हा संदेश शेअर करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली. संघाच्या पराभवामुळे तो किती खोलवर दुःखी झाला आहे, हे या इन्स्टाग्राम स्टोरीवरून दिसून येते.

RCB vs GT Final मध्ये पावसाचा खोळंबा ? सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार IPL ट्रॉफी? वाचा ‘हे’ नियम

राजस्थान रॉयल्सच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये वैभवने लिहिले आहे, “२० षटकांत भावना किती लवकर बदलू शकतात यावर अजूनही विश्वास बसत नाही. आजची रात्र खूप वेदनादायी आहे. हे खूप खोलवर बोचत आहे. दुःख, निराशा, वैफल्य आणि अशा अनेक भावना आहेत ज्या आम्हाला सहन कराव्या लागतील. ज्याचे श्रेय त्याला दिलेच पाहिजे. शुभमन गिल आणि गुजरात टायटन्स आज रात्री उत्कृष्ट खेळले.”

 

Web Title: Shubhman gill good statement about vaibhav suryvanshi performance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 10:03 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Shubhman Gill
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

झाला झाला खूप मोठा भूकंप! ICC Test Rankings मध्ये Shubhman Gill ला नुकसान तर बाबर आझम थेट…
1

झाला झाला खूप मोठा भूकंप! ICC Test Rankings मध्ये Shubhman Gill ला नुकसान तर बाबर आझम थेट…

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव
2

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी
3

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.