
FIFA World Cup 2026: मैदानावर फुटबॉल नव्हे, थेट विषारी साप! जर्मनीची टीम थोडक्यात बचावली
कर्णधार म्हणून आणि कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवताना गिलने सात शतके झळकावली आहेत. द्रविडने एकूण सहा शतके केली होती. या यादीत विराट कोहली अव्वल स्थानी आहे. सर्वाधिक एकदिवसीय डाव खेळणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत गिलने सातव्या स्थानावर झेप घेतली आहे.
भारतात वनडे सामन्यांमध्ये १००० धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत गिलने अव्वल स्थान पटकावले आहे. गिल हा वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. शुभमनने भारतात १९ डावांमध्ये हा विक्रम केला. या बाबतीत गिलने विराट कोहलीला मागे टाकले आहे. कोहलीने भारतात वनडे सामन्याच्या २४ डावांमध्ये १००० धावा पूर्ण केल्या होत्या. दुसरीकडे, धवननेही भारतात वनडे सामन्यांमध्ये २४ डावांमध्ये १००० धावा पूर्ण केले आहेत.
याव्यतिरिक्त, गिल सर्वात वेगवान ३,००० वनडे धावा पूर्ण करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने ६२ डावांमध्ये ३,००० धावा पूर्ण केलेत. तर, कोहलीने ७५ डावांमध्ये ३,००० वनडे धावा पूर्ण केल्या होत्या. एकूणच, गिल ३,००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा दुसरा सर्वात वेगवान फलंदाज ठरला आहे. सर्वात जलद वनडे धावसंख्येचा जागतिक विक्रम हाशिम आमलाच्या नावावर आहे. आमलाने ५७ डावांमध्ये ३,००० धावा पूर्ण केल्या होत्या.