GT vs MI: Unique record in the name of Shubman Gill
GT vs MI : आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील 9 वा सामना काल (दि. 29 मार्च) मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात आला होता. गुजरातमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 36 धावांनी पराभव केला आहे. या हंगामातील जीटीचा पहिला विजय ठरला आहे तर मुंबईला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात शुभमन गिलसाठी हा सामना खास ठरला आहे. या सामन्यानंतर गिल आयपीएलच्या इतिहासातील एका खास यादीत जाऊयान पोहचला आहे. हा त्याच्याठी मोठी उपलब्धी मानली जाता आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात 1 हजार धावा करणारा शुभमन गिल आता पहिला भारतीय खेळाडू ठरल्याचा मान मिळाला आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या 1 हजार धावा पूर्ण करण्यासाठी गिलला आज 14 धावांची गरज होती. या सामन्यात गिलने 27 चेंडूत 38 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 4 चौकार यानी 1 षटकार लगावला आहे. त्यानुसार नरेंद्र मोदी स्टेडियमवर 1 हजार धावा करणारा गिल हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. शुभमन गिल या मैदानावर नेहमीच चांगली फलंदाजी करत आला आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर गिलच्या नावावर तीन शतके आणि चार अर्धशतके आहेत.
हेही वाचा : GT vs MI : आशिष नेहरा रागाने लालबुंद? दोन हात पुढे करून केली गर्जना..! नेमकं काय घडलं? पहा VIDEO
नरेंद्र मोदी स्टेडियमवर 1 हजार धावा करणाऱ्यांच्या यादीत गिल आता पहिला भारतीय ठरला आहे. याआधी हा कारनामा कुणालाच करता आलेला नाही. याशिवाय आयपीएलमध्ये कोणत्याही मैदानावर सर्वात जलद 1 हजार धावा करणारा तो पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. उल्लेखनीय बाब अशी की, हा विक्रम यापूर्वी सूर्यकुमार यादवच्या नावावर होता. त्याने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 31 डावात 1 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
एकूणच या रेकॉर्डबद्दल सांगायचे झाले तर तो ख्रिस गेलच्या नावावर कायम आहे. बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर गेलने अवघ्या 19 डावांत 1 हजार धावा केल्या आहेत. सध्याच्या घडीला सांगायचे झाल्यास शुभमन गिलने काल नोंदवलेल्या विक्रमांमध्ये डेव्हिड वॉर्नर आणि शॉन मार्शसारख्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मागे सोडले आहे.
हेही वाचा : MI vs GT : चल जा..! Hardik Pandya आणि साई किशोर यांच्यात नजरेला नजर : आग ओकणारे ते 10 सेकंद अन्..,पहा Video
नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात गुजरातने मुंबुईला पराभूत केले आहे. या विजयाने गुजरातने आयपीएल 2025 मधील पहिला विजय मिळवला तर मुंबईला मात्र सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 8 गडी गमावून 196 धावा केल्या. 197 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला मात्र 6 गड्यांच्या मोबदल्यात 160 धावापर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे 36 धावांनी मुंबईला पराभवाला सामोरे जावे लागले.