आशिष नेहरा(फोटो-सोशल मीडिया)
GT vs MI : आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील 9 वा सामना काल (दि. 29 मार्च) अहमदाबादच्या नरेंद्र स्टेडियमवर खेळवण्यात अल. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने होते. या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 36 धावांनी पराभवाची धूळ चार्ली पराभव करत या हंगामातील पहिला विजय मिळवला. तर मुंबई इंडियन्सच्या संघाला सलग दूसरा सामना गमवावा लगाला. मात्र, या सामन्यात जीटीचे प्रशिक्षक आशिष नेहरा अचानक संतापाने लाल झालेला दिसून आला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
गुजरातकडून सलामीवीर म्हणून आलेल्या शुभमन गिल आणि साई सुदर्शन हे फलंदाजीसाठी आले आणि त्यांनी पहिल्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी रचली. मात्र, यानंतर जोस बटलरनेही 24 चेंडूंत 39 धावांची वेगवान खेळी साकारली. पण, 19 व्या षटकात जीटीने लागोपाठ दोन विकेट गमावल्या. यामुळे आशिष नेहराला चांगलाच राग आला आणि त्याने आपल्या संघातील खेळाडूंवर उघडपणे ओरडण्यास सुरुवात केली. ते सर्वांनाच दिसून आली. याचा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे.
हेही वाचा : MI vs GT : चल जा..! Hardik Pandya आणि साई किशोर यांच्यात नजरेला नजर : आग ओकणारे ते 10 सेकंद अन्..,पहा Video
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की, आशिष नेहरा त्याच्या टीमवर ओरडत आहे. सामन्यादरम्यान नेहरा आपल्या संघाला अनेकदा समजावून सांगत असल्याचे दिसून येते आहे. त्याचे अनेक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हेही वाचा : IPL 2025 : IPL 2025 मध्ये Rohit Sharma चा फ्लॉप शो सुरूच : GT विरुद्ध सिराजने उडवली दांडी..
नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात गुजरातने मुंबुईचा पराभव केला. या विजयाने गुजरातने आयपीएल 2025 मधील पहिला विजय साजरा केला तर मुंबईला मात्र सलग दुसऱ्या पराभव पत्करावा लगाला. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 8 गडी गमावून 196 धावा केल्या. 197 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला मात्र 6 गड्यांच्या मोबदल्यात 160 धावापर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे 36 धावांनी मुंबईला पराभव पत्करावा लागला.
रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, मिशेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू, मुजीब उर रहमान
शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, शेरफेन रदरफोर्ड, जोस बटलर (यष्टीरक्षक), शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, कागिसो रबाडा, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज