भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यात टीम इंडीयाने दुसऱ्या दिनी भारताच्या संघाने ना फलंदाजी चांगली केली ना गोलंदाजी चांगली केली. फक्त जसप्रीत बुमराहच्या हाती तीन विकेट्स लागले होते. त्या व्यतिरिक्त प्रसिद्ध कृष्णा मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा हे तीनही गोलंदाज रिकाम्या हाती पॅव्हेलियनमध्ये परतले. तिसऱ्या दिनी भारताच्या संघाने सात विकेट्स घेतले आणि 465 धावांवर इंग्लंडच्या संघाला रोखले यामध्ये महत्त्वाची इंग्लंडची फलंदाजी ही हॅरी ब्रुक याची राहिली. त्याने भारताच्या एकही गोलंदाजाला सोडले नाही पण प्रसिद्ध कृष्णा याने त्याला 99 धावांवर बाद केले आणि त्याचे एक धावेने शतक हुकले.
हॅरी ब्रुक याच्या विकेट आधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो मोहम्मद सिराजशी वाद घालतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. इंग्लंडच्या डावाच्या ८४ व्या षटकात ब्रूक त्याच्या शतकाच्या जवळ असताना ही घटना घडली. दोघांमधील हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तिसऱ्या दिवसाची सुरुवात भारतीय संघासाठी चांगली झाली. पहिल्या षटकात प्रसिद्ध कृष्णाने शतकवीर पोपची विकेट घेतली, पण नंतर हॅरी ब्रूक एका टोकाला खंबीरपणे उभा राहिला. त्याने शानदार फलंदाजी केली.
दरम्यान, सिराजच्या षटकात ब्रूक आणि सिराजमध्ये वाद झाला तेव्हा एक षटक सुरू झाला. हे ८४ वे षटक होते, जेव्हा ब्रूकने सिराजच्या चेंडूवर सलग दोन चौकार मारले, त्यानंतर सिराज परतला आणि त्याने वेगवान इनस्विंग चेंडू टाकला. यानंतरही, सिराज थांबला नाही आणि ब्रुककडे पाहत राहिला आणि काही शब्द बोलला. प्रत्युत्तरादाखल, ब्रुकने फक्त हात हलवत सिराजला त्याच्या रन-अपवर परतण्याचा इशारा केला. सिराजच्या या षटकात ब्रुकने एकूण १८ धावा काढल्या.
स्टार स्पोर्ट्सने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर या दोन्ही खेळाडूंचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सिराज आणि हॅरी ब्रूक एकमेकांकडे रागाने पाहत असल्याचे दिसून येते.
👀😯🗣️ Tensions rising in the middle!#MohammedSiraj and #HarryBrook in a fiery exchange as the heat is on at Headingley! 🔥#ENGvIND 1st Test Day 3 LIVE NOW Streaming on JioHotstar 👉 https://t.co/SIJ5ri9fiC pic.twitter.com/nKZTSeFZt1
— Star Sports (@StarSportsIndia) June 22, 2025
जर आपण सामन्याबद्दल बोललो तर, IND विरुद्ध ENG यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस, भारतीय संघाने दुसऱ्या डावात 2 विकेट गमावून 90 धावा केल्या आहेत. अशा प्रकारे, भारताकडे तिसऱ्या दिनाच्या समाप्तीनंतर 96 धावांची आघाडी घेतली आहे. सध्या, केएल राहुल 47 धावांवर नाबाद आहे तर शुभमन गिल 6 धावांवर नाबाद आहे.