
smriti mandhana
ओपनिंगला खेळण्यासाठी आलेल्या स्मृती मानधनाने हाँगकाँगच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. तिने चौफेर फटकेबाजी करत ६४ चेंडूंत १२४ धावा कुटल्या. या वादळी खेळीत तिने १४ चौकार आणि ७ गगनचुंबी सिक्स मारले. या शतकासह स्मृती मानधनाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत.
IND W Vs PAK W: फडशा पाडायला वाघिणी सज्ज; भारत-पाक आमनेसामने, कधी व कुठे होणार सामना?
स्मृती मानधनाने कालच्या सामन्यात आपले टी २० मधले दुसरे शतक पूर्ण केले आहे. तर इंटरनॅशनल क्रिकेटमधले तिचे हे १८ वे शतक ठरले आहे. स्मृती मानधनाच्या या वादळी शतकाच्या जोरावर भारतीय संघाने हाँगकाँगला १९४ रन्सचे टार्गेट दिले होते. १९४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांच्या अचूक माऱ्यासमोर हाँगकाँगचा फलंदाजी क्रम पत्त्यांसारखा कोसळला. संपूर्ण हाँगकाँगचा संघ अवघ्या ५६ धावांवर गारद झाला. भारताने हा सामना १३७ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकून स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवला आहे.
हाँगकाँगविरुद्ध महिला आशिया चषकात ६४ चेंडूंत १२४ धावांची स्फोटक खेळी साकारल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या. माझ्यासाठी फक्त वैयक्तिक धावा करणे किंवा नवे रेकॉर्ड रचणे एवढेच महत्त्वाचे नाही. माझ्या या कामगिरीकडे पाहून जर देशातील १० टक्के मुलींनी जरी हातात बॅट आणि बॉल उचलून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली, तर मला या गोष्टीचा आयुष्यभर प्रचंड अभिमान आणि आनंद वाटेल.”