उद्या भारत पाकिस्तान भिडणार (फोटो- सोशल मिडिया)
महिला आशिया कप स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने शानदार कामगिरी केली आहे. तसेच पहिले दोन्ही सामने जिंकले असून सेमीफायनलमध्ये आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. १३७ रन्सने भारताने हाँगकाँगचा दणदणीत पराभव केला आहे. त्यातच आता उदय भारत आणि पाकिस्तान भिडणार आहेत.
ठिकाण – दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पुन्हा एकदा क्रिकेट जगतातील सर्वात मोठा आणि थरारक सामना पाहायला मिळणार आहे. शनिवारी, ५ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर येणं आहेत. भारताने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. तर दोन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. पाकिस्तानने देखल एक सामना जिंकला आहे. दुसरीकडे, सध्याच्या दमदार कामगिरीमुळे भारतीय खेळाडूंचे मनोबल उंचावले असून संघ विजयाची मालिका कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरेल.
पत्रकार परिषदेत भारतीय खेळाडू सामना संपल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हात मिळवणार का, असा थेट प्रश्न विचारण्यात आला. मात्र, कर्णधार हरमनप्रीत कौरने या वादावर किंवा प्रश्नावर कोणतेही थेट उत्तर न देता उत्तर देणे टाळले. भारतीय संघ केवळ खेळावर लक्ष केंद्रित करेल असे तिने उत्तर दिल्याचे समोर येत आहे.
कर्णधार हरमनप्रीत कौरने स्पष्ट केले की, “आम्ही कोणत्याही एका विशिष्ट संघावर किंवा सामन्यावर लक्ष केंद्रित करत नाही आहोत. सर्वच आशियाई संघांमध्ये गेल्या २-३ वर्षांत मोठी सुधारणा झाली आहे. आमचे मुख्य ध्येय मैदानावर उत्कृष्ट क्रिकेट खेळणे हेच आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने दिली आहे.






