smriti Mandhana birthday (फोटो- ians)
आज भारतीय संघाची स्टार सलामीवीर आणि उपकर्णधार स्मृती मंधानाचा वाढदिवस आहे. जगभरातून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. भारतीय क्रीडा क्षेत्रात गेल्या काही वर्षांत एक मोठा आणि सकारात्मक बदल पाहायला मिळत आहे. एकेकाळी फारशी चर्चा नसलेल्या ‘भारतीय महिला क्रिकेट’ची लोकप्रियता आता गगनभरारी घेत आहे. भारतीय महिला क्रिकेटचे हे रुपडे बदलण्यामागे ज्या काही मोजक्या खेळाडूंचे मोलाचे योगदान मानले जाते, त्यात स्मृतीचा देखील समावेश आहे.
स्मृती मंधानाचा जन्म 18 जुलै 1996 मध्ये मुंबईत झाला. तिचे कुटुंब आधीपासूनच क्रिकेट क्षेत्राशी जोडलेले होते. तिचे वडील आणि भू दोघेही क्रिकेट खेळत असत. त्यामुळे लहानपणापासून स्मृतीला देखील क्रिकेट खेळण्याची आवड निर्माण झाली. डाव्या बाजूने फलंदाजी करणे तिला आवडत असे. नवव्या वर्षीच तिने महाराष्ट्राच्या अंडर 15 संघात प्रवेश मिळवला होता. 11 व्या वर्षी ती अंडर 19 संघाची खेळाडू बनली.
त्यानंतर स्मृतीने अजिबात मागे वळून देखील पहिले नाही. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तिने आज स्वतःला सिद्ध केले आहे. 5 एप्रिल 2013 मध्ये तिने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून आजपर्यंत तिने केलेली मेहनत आज सर्वांना दिसून येत आहे. टीम इंडियाची सर्वात स्टार खेळाडू आणि मॅचविनर खेळाडू म्हणून ती आज ओळखली जात आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने अनेक मोठे रेकॉर्ड रचले आहेत. ज्यामध्ये स्मृतीचा देखील मोठा वाटा राहिला आहे. सलामीवीर म्हणून तिने अनेक महत्वाच्या खेळी केल्या आहेत. क्षेत्ररक्षण असो वा फलंदाजी असो स्मृती कायमच आघाडीवर राहिली आहे. स्मृती केवळ भारताचीच नव्हे तर जागतिक क्रिकेटमध्ये एक अव्वल फलंदाज म्हणउण ओळखली जाऊ लागली आहे. अशा या लोकप्रिय, प्रतिभावान, दिग्गज क्रिकेटपटू स्मृती मंधानाला ‘नवराष्ट्र’कडून देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
लॉर्ड्सवर Smriti Mandhana चा जागतिक रेकॉर्ड! पेरी अन् सुने ल्युसला पछाडत रचला ‘हा’ अभूतपूर्व इतिहास
जेमिमा रॉड्रिग्जने दिल्या स्मृतीला शुभेच्छा
स्मृतीच्या वाढदिवसाबद्दल जेमिमा रॉड्रिग्जने एक खास पोस्ट शेयर केली आहे. सोशल मिडियावर पोस्ट करत तिने स्मृतीला शुभेच्छा दिल्या आहेत. माझ्या वाईट काळात माझ्यावर प्रेम करणारी तसेच माझ्या यशामध्ये सर्वात आनंदी होणारी. तू माझ्या आयुष्यात आहेत याबाबत मी अत्यंत खुश आणि आनंदी आहे. आपल्या मनात एकमेकांबद्दल असलेले प्रेम, काळजी कायम अशीच राहील. म्हणूनच (म्हातारी झालेल्या मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा) मी तुझ्यावर मनापासून प्रेम करते.






