Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sourav Ganguly: सौरव गांगुली आणि पत्नी डोनाला जीवे मारण्याची धमकी! सतत पत्रांचा भडीमार, काय आहे प्रकरण

Sourav Ganguly: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि त्यांच्या पत्नीला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर कोलकाता पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 11, 2026 | 09:42 AM
सौरव गांगुली आणि पत्नी डोनाला धमकीची पत्रं (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

सौरव गांगुली आणि पत्नी डोनाला धमकीची पत्रं (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सौरव गांगुलीला जीवे मारण्याची धमकी 
  • पत्नी डोनासह मारणार असल्याचे पत्र 
  • काय आहे नक्की प्रकरण 
Sourav Ganguly: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि BCCI चा अध्यक्ष सौरव गांगुली आणि त्याची पत्नी डोना गांगुली यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. कोलकाता पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे. अलीकडेच सौरव गांगुली यांच्या कार्यालयात अशी दोन पत्रे आली, ज्यात या दाम्पत्याला आणि त्यांच्या जवळच्या लोकांना थेट इजा पोहोचवण्याची धमकी देण्यात आली आहे. नक्की प्रकरण काय आहे जाणून घ्या. 

गांगुलींच्या कुटुंबावर सतत हल्ले होत आहेत

मिळालेल्या वृत्तानुसार, सौरव गांगुलीला गेल्या काही महिन्यांपासून आक्षेपार्ह टिप्पणी असलेली पत्रे मिळत आहेत. मात्र, सुरुवातीला या पत्रांकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. गांगुलींच्या सचिवांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला असे मानले जात होते की, गांगुलींना नापसंत करणाऱ्या आणि आपला राग व्यक्त करणाऱ्या कोणाच्यातरी वैयक्तिक द्वेषातूनच हे घडले आहे. मात्र, सोमवारी जीवे मारण्याच्या स्पष्ट धमक्या असलेली दोन नवीन पत्रे आल्यानंतर या परिस्थितीकडे अत्यंत गांभीर्याने घेतले गेले आणि पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

Dinvishesh : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार क्रिकेटचा दादा सौरव गांगुलीचा वाढदिवस; जाणून घ्या ०८ जुलैचा इतिहास

पोलिसात तक्रार दाखल

वाढत्या धोक्याची शक्यता लक्षात घेऊन सौरव गांगुलीच्या कार्यालयाने मंगळवारी दक्षिण कोलकाता येथील ठाकूरपुकुर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीत म्हटले आहे की, पत्रे पाठवणाऱ्याचे नाव अरुण असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही पत्रे उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बेलघरिया भागातून कुरिअरमार्फत पाठवण्यात आल्याचा संशय आहे. मात्र अजूनही त्यावर शिक्कामोर्तब झालेले नाही 

ठिकाणाचा शोध सुरू

हे प्रकरण अत्यंत संवेदनशील मानून पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे. पत्र नेमके कोठे पोहोचले याचा मागोवा घेण्यासाठी अधिकाऱ्यांचे एक विशेष पथक कुरिअर एजन्सीच्या नेटवर्कची तपासणी करत आहे. संशयिताशी संबंधित मोबाईल नंबर आणि सिम कार्डच्या ठिकाणाचाही शोध घेतला जात आहे. गेल्या काही महिन्यांत मिळालेली सर्व पत्रे एकाच व्यक्तीने पाठवली आहेत की यात एखाद्या टोळीचा सहभाग आहे, याचाही तपास अधिकारी करत आहेत.

आरोपीला लवकरात लवकर शोधून काढण्यासाठी सर्व तांत्रिक आणि क्षेत्रीय बाबींवर काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसरीकडे, या संपूर्ण घटनेवर आणि धमकीच्या पत्रांवर सौरव गांगुली किंवा त्यांच्या पत्नी डोना गांगुली यांनी अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.

काय फालतूगिरी! सोशल मिडियावर ‘दादा’ची बदनामी; Sourav Ganguly ने ‘त्या’ पेजविरुद्ध केली तक्रार

Web Title: Sourav ganguly and wife donna receive death threat through letters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 09:42 AM

Topics:  

  • cricket news
  • Sourav Ganguly
  • threatens

संबंधित बातम्या

Cricket: ८० रन्सची तुफानी खेळी अन् सलग दुसरा विजय! ‘रायझिंग स्टार ब्ल्यू’ चा दणदणीत पराक्रम
1

Cricket: ८० रन्सची तुफानी खेळी अन् सलग दुसरा विजय! ‘रायझिंग स्टार ब्ल्यू’ चा दणदणीत पराक्रम

IPL 2027: सौरव गांगुली हेड कोच, दिल्ली कॅपिटल जिंकणार? कर्णधारही बदलणार असल्याचे संकेत
2

IPL 2027: सौरव गांगुली हेड कोच, दिल्ली कॅपिटल जिंकणार? कर्णधारही बदलणार असल्याचे संकेत

IND vs WI T20: अरे देवा! लखनऊ स्टेडियमजवळ भरलं पाणी, सामन्यावर काय होणार परिणाम? 200+ चा आकडा करणार का पार
3

IND vs WI T20: अरे देवा! लखनऊ स्टेडियमजवळ भरलं पाणी, सामन्यावर काय होणार परिणाम? 200+ चा आकडा करणार का पार

IND vs NZ: पुढच्या आठवड्यात होणार न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, प्रज्ञान ओझाच्या हाती खेळाडूंच्या नशिबाची दोर
4

IND vs NZ: पुढच्या आठवड्यात होणार न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, प्रज्ञान ओझाच्या हाती खेळाडूंच्या नशिबाची दोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.