फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका त्रिकोणी मालिकेचा दुसरा सामना : न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सध्या त्रिकोणी मालिका पाकिस्तानमध्ये खेळवली जात आहे. यामध्ये पहिल्या सामन्यांमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये सामना झाला होता. यामध्ये न्यूझीलंडच्या संघाने सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. पाकिस्तानमध्ये २०२५ मध्ये होणाऱ्या त्रिकोणी एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जात आहे. हा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळला जात आहे. २७ षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ १३५/३ धावा करतो. विआन मुल्डर २ आणि मॅथ्यू ब्रीट्झके ५८ धावांवर खेळत आहेत.
Matthew Breetzke on 58*, approaching big toward the century. Good fifty by the debutant when there was a need to stay on the crease. #SAvNZ pic.twitter.com/jwo0Llws42
— Yugal (@iamYugal18) February 10, 2025
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यांमध्ये न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ३२ ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ३ विकेट्स गमावले आहेत. तर १४९ धावा केल्या आहेत. जेसन स्मिथ याने संघासाठी ४१ धावांची महत्वाची खेळी खेळली त्यानंतर त्याला मिचेल सँटनर बाहेरचा रस्ता दाखवला. काइल व्हेरेने हा फलंदाजीमध्ये फेल झाला, तो संघासाठी फक्त १ धाव करून बाद झाला. सध्या मैदानामध्ये हा लेख लिहिपर्यत मॅथ्यू ब्रीट्झके याने १०२ चेंडूंमध्ये ७२ धावांचा नाबाद खेळी खेळली आहे.
विआन मुल्डर या सात धावांवर टिकून आहे, सध्या तो मॅथ्यू ब्रीट्झकेची साथ देत आहे. गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर विल ओ रौस्क याने संघासाठी एक विकेट घेतला तर मायकेल ब्रेसवेल याने एक विकेट घेतला.
Champions Trophy 2025 चे विजेतेपद कोण जिंकेल? आर अश्विनने केली भविष्यवाणी! हे दोन संघ खेळणार फायनल
या मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना १२ फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना दक्षिण विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये रंगणार आहे. त्यानंतर या मालिकेमध्ये जो संघ सर्वाधिक सामने जिंकेल तो संघ फायनलचा सामना खेळणार आहे. यामध्ये न्यूझीलंडच्या संघाचे संधी फायनलमध्ये जाण्याच्या जास्त आहेत.
पाकिस्तानकडे चॅम्पियन ट्रॉफी २०२५ चे यजमानपद सोपवण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये आठ संघ सहभागी झाले आहेत. आठ संघ दोन गटांमध्ये विभाजन करण्यात आले आहेत. पहिल्या गटामध्ये बांग्लादेश, पाकिस्तान, भारत आणि न्यूझीलंड या संघाचा समावेश आहे. तर दुसऱ्या गटामध्ये अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका हे संघ आहेत. या स्पर्धेचा पहिला सामना पाकिस्तानमध्ये १९ फेब्रुवारी रोजी रंगणार आहे, हा सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. भारताचा संघ युएईमध्ये पहिला सामना बांग्लादेश विरुद्ध २० फेब्रुवारी रोजी खेळणार आहे. आयसीसीच्या हायव्होल्टेज सामना २३ फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये होणार आहे.