IPL Most Sixes Record (फोटो- ai gemini)
आयपीएलमध्ये पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड
एसआरएच विरुद्ध पंजाब सामन्यात 16 सिक्सचा विक्रम
अभिषेक शर्माने केले वादळी अर्धशतक
SRH Vs PBKS Records: आज न्यू चंदीगडमध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्जने एसआरएचवर 6 विकेट्सने विजय मिळवला. दोन्ही संघाच्या (IPL 2026) फलंदाजीमध्ये पॉवर प्लेमध्ये आक्रमकता दिसून आली. हैद्राबादकडून ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा आणि पंजाबकडून प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्याने तूफान खेळी केली. त्यामुळे पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रम आयपीएलमध्ये झाला आहे.
पॉवर प्लेमध्ये नवा विक्रम
आयपीएलच्या इतिहासात पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रम रचला गेला आहे. एसआरएच आणि पंजाब किंग्जच्या फलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये खेळताना एकूण 16 सिक्स मारले आहेत. त्यामुळे आयपीएलमध्ये नवा विक्रम निर्माण झाला आहे. याआधी 2024 मध्ये एसआरएच आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये एकूण 15 सिक्स मारले गेले होते. मात्र या सामन्यात 16 सिक्स मारून नवा रेकॉर्ड झाला आहे.
PBKS Vs SRH Live: पंजाबच्या वाघानं फाडून खाल्लं; Shreyas Iyer ने ‘ऑरेंज आर्मी’ला नमवत उधळला गुलाल
Abhishek Sharma ने पंजाबला धुतलं
ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माने एसआरएचच्या डावाची सुरुवात केली. दोघांनी पॉवर प्लेमध्ये एकही विकेट न गमावता 100 रन्सची भागीदारी केली. ट्रेविस हेड 38 रन्स करून आउट झाला. तर अभिषेक शर्माने 18 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. अखेर अभिषेक शर्मा सिक्स मारण्याच्या नादात 78 रन्स करून आउट झाला. त्यानंतर हेनरी क्लासेन आणि कर्णधार इशान किशन खेळण्यासाठी मैदानात उतरले. इशान किशन 27 रन्स करून आउट झाला. तर अनिकेत वर्माने 18 रन्स केल्या. तर सलिल अरोराने 9 रन्स केल्या. हेनरी क्लासेन शेवटच्या ओव्हरमध्ये 39 रन्स करून आउट झाला. नितीश कुमार रेड्डी नॉटआउट राहिला. त्याने एकही रन केले नाही.
Shreyas Iyer ने ‘ऑरेंज आर्मी’ला लोळवलं
220 रन्सचा आव्हान गाठण्यासाठी पंजाब किंग्जकडून प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश शर्मा खेळण्यासाठी आले. त्या दोघांनी पॉवर प्लेमध्ये चांगली फलंदाजी केली. पंजाबला एक चांगल्या धावसंख्येचा पाया त्यांची रचून दिला. प्रभसिमरन सिंगने अर्धशतक केले. 51 रन्सकरून तो आउट झाला. त्यानंतर प्रियांश आर्याने 57 रन्सची वादळी खेळी केली. कूपर कॉनली या सामन्यात चांगली खेळी कृ शकला नाही. तो 11 रन्स करून आउट झाला.
SRH Vs PBKS: हैदराबादने ‘कुटलं’ अन् Abhishek Sharma ने ‘धुतलं’; PBKS ला विजयासाठी 220 रन्सचे टार्गेट






