सुनील गावस्कर यांचे वैभव सूर्यवंशीबाबत मोठे विधान (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
याचसंदर्भात आता माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी यावर एक मोठे विधान केले आहे. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कशी बोलताना गावस्कर म्हणाले की, वैभव सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला होणारा विलंब संघावर अधिक दबाव टाकेल. त्यांनी कर्णधार श्रेयस अय्यर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याशिवाय आपला रागही त्यांनी व्यक्त केला.
वैभव सूर्यवंशीबद्दल सुनील गावस्कर यांचे मोठे विधान
🚨 Sunil Gavaskar angry at Shreyas Iyer & Gautam Gambhir 🚨 🗣️I don’t understand why coach Gautam Gambhir and Shreyas Iyer don’t want to give Vaibhav Suryavanshi a chance. Vaibhav was one of the top performers in the IPL, scoring plenty of runs and hitting the most sixes in a… pic.twitter.com/mS3LGLG1mS — Central Cricket (@arshdeep3444) July 1, 2026
सुनील गावस्कर म्हणाले, “जेव्हा कधी वैभवला संधी मिळेल, तेव्हा या विलंबामुळे त्याच्यावर अधिक दबाव येईल. १५ वर्षांचे असताना तुम्ही दबावाचा फारसा विचार करत नाही. त्याला माहीत आहे की जर त्यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात संधी मिळाली, तर त्याला तसेही चांगली कामगिरी करावी लागेल. पण तो संघात असल्यामुळे आनंदी आहे. भारतीय संघ उत्कृष्ट खेळाडूंनी भरलेला आहे, ज्यांच्याकडून वैभव बरेच काही शिकू शकतो.”
“मला समजत नाही की प्रशिक्षक गौतम गंभीर आणि श्रेयस अय्यर वैभव सूर्यवंशीला संधी का देऊ इच्छित नाहीत,” असेही ते पुढे म्हणाले. वैभव IPL मधील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक होता, त्याने एका हंगामात भरपूर धावा केल्या आणि सर्वाधिक षटकार मारले. अंतिम ११ मध्ये स्थान मिळवण्यासाठी वैभवला आणखी काय करण्याची गरज आहे? माझ्या मते, इंग्लंड मालिकेच्या पहिल्या सामन्यापासूनच तो संघात असायला हवा होता.”
‘… अन् त्याला बेंचवर बसवले आहे’; Vaibhav Sooryavanshi वरून रवी शास्त्रींचा टीम इंडियाला घरचा आहेर
श्रेयस अय्यर होतोय ट्रोल
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत श्रेयस वैभव सूर्यवंशीबद्दल अय्यर म्हणाला होता की, ‘केवळ एकाच खेळाडूने (वैभव सूर्यवंशी) चांगली कामगिरी केली आहे असे नाही. इतर खेळाडूही चांगले खेळले आहेत. खेळाडूंना सुरक्षितता आणि आत्मविश्वास देण्यासाठी त्यांना पाठिंबा देणे महत्त्वाचे आहे. तो संघाचा मुख्य खेळाडू आहे आणि विश्वचषक विजेत्या संघाचा भाग राहिला आहे, त्यामुळे त्याला पाठिंबा देणे महत्त्वाचे आहे,’ असे पत्रकार परिषदेत अय्यर म्हणाला होता.
इंग्लंडचा भारताविरुद्धचा पहिला टी-२० सामना अनिर्णित राहिला
१ जुलै रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक शर्माच्या ५९, श्रेयस अय्यरच्या ६८ आणि शिवम दुबेच्या ४२ धावांच्या जोरावर टीम इंडियाने २० षटकांत ७ गडी गमावून १८९ धावा केल्या. या सामन्यात इंग्लंडला फलंदाजीची संधी मिळाली नाही आणि पावसामुळे सामना अनिर्णित घोषित करण्यात आला.
बिचाऱ्याला आता तरी खेळवा रे! कधी होणार IND Vs ENG 2 रा सामना? Vaibhav Sooryavanshi ला संधी देणार?






