भारत-पाकिस्तान सामन्यावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय (फोटो- ani/istockphoto)
14 सप्टेंबरला भारत-पाकिस्तान सामना
आशिया कप स्पर्धेत रंगणार सामना
पहलगाम हल्ल्यानंतर प्रथमच येणार आमने-सामने
Asia Cup 2025: आशिया कप स्पर्धा सुरू झाली आहे. कालच भारताने संयुक्त अरब अमिरातीवर जोरदार विजय प्राप्त केला आहे. दरम्यान 14 तारखेला या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. दरम्यान हा सामना रद्द करावा अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाने या याचिकेवर महत्वाचा निर्णय दिला आहे.
आशिया कप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामना रद्द व्हावा अशी एक जनहित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. ऑपरेशन सिंदूरचा संदर्भ देत पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणे हे राष्ट्रीय भावनेच्या विरोधात असल्याचे या जनहित याचिकेत म्हणण्यात आले होते. दरम्यान सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामन्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सैनिकांनी दिलेल्या बलीदानानंतर पाकिस्ताविरुद्ध सामना खेळणे शहीदांच्या कुटुंबाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. नागरिकांची सुरक्षा, राष्ट्रहीत, हेच आपले प्रथम प्राधान्य असले पाहिजे असे या जनहित याचिकेत सांगण्यात आले होते. हा सामना रविवारी असल्याने याचिकाकर्त्यांनी शुक्रवारी खटला सुनावणीसाठी घ्यावा, अशी विनंती केली.
याचिकाकर्त्यांनी केलेल्या विनंतीला सुप्रीम कोर्टातील खंडपीठाने नकार दिला. “भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना रोखण्याचा आमचा कसलाही विचार नाही. हा तर सामना आहे. इतकी घाई कसली आहे? असे म्हणत सुप्रीम कोर्टाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे आता 14 तारखेला दुबईत भारत पाकिस्तान यांच्यातील सामना खेळला जाणार आहे.
हे उल्लेखनीय आहे की बुधवारी भारताने आशिया कप २०२५ मध्ये दमदार सुरुवात केली. युएईचा ९३ चेंडू आणि ९ विकेट्स राखून पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना युएईने ५७ धावा केल्या. कुलदीप यादवने चार विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने २७ चेंडूत १ विकेट गमावून ६० धावा करून सामना जिंकला.
IND vs UAE : कुलदीप यादवने घेतली UAE ची फिरकी; दिग्गज आर अश्विनला टाकले ‘या’ विक्रमात मागे..
२०२४ च्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर कुलदीप यादवचा आशिया कप २०२५ मध्ये यूएई विरुद्ध हा पहिलाच टी२० आंतरराष्ट्रीय सामना होता. त्यामुळे यावेळी सर्वांच्या नजरा त्याच्यावर टिकून होत्या आणि त्याने देखील कुणाला निराश केले नाही. त्याने एकाच षटकात त्याने तीन विकेट्स काढल्या. या दरम्यान, त्याने त्याच्या स्पेलमध्ये एकूण फक्त ७ धावा मोजल्या. या शानदार कामगिरीनंतर, कुलदीप आता भारताचा दिग्गज माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला देखील मागे टाकत परदेशात भारतासाठी सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय बळी घेणारा गोलंदाज बनला आहे.