
Table Tennis
सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत मयुरेशने सामन्यावर वर्चस्व राखले आणि सहज विजय मिळवत विजेतेपदावर आपले नाव कोरले. मयुरेश सावंत हा व्ही. जी. वझे (केळकर) कॉलेजमध्ये अकरावी इयत्तेत शिक्षण घेत असून पेस टेबल टेनिस अकादमीमध्ये प्रशिक्षक मानस करमरकर आणि जुबीन तारापूरवाला यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
दरम्यान, १७ वर्षांखालील मुलींच्या गटात नाशिकच्या स्वरा करमरकरने अंतिम सामन्यात ठाण्याच्या त्रिशा लुडबेवर ११-४, ११-५, ९-११, ६-११, ११-० असा विजय मिळवत विजेतेपद पटकावले. सुरुवातीचे दोन्ही गेम जिंकल्यानंतर त्रिशाने तिसरा व चौथा गेम जिंकत सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र निर्णायक पाचव्या गेममध्ये स्वराने दमदार खेळ करत ११-० असा एकतर्फी विजय मिळवला आणि विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.स्वरा करमरकर ही बी. वाय. के. कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये अकरावी इयत्तेत शिक्षण घेत असून जय मोडक टेबल टेनिस अकादमीमध्ये प्रशिक्षक जय मोडक आणि पुनित देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
उपांत्य फेरी
मयुरेश सावंत (ठाणे) वि.वि. आहान गोसर (ठाणे) — ११-७, १२-१०, १२-१०
प्रतीक तुळसानी (ठाणे) वि.वि. श्रेयस माणकेश्वर (पुणे) — ११-७, ११-६, १४-१२
अंतिम फेरी :
मयुरेश सावंत (ठाणे) वि.वि. प्रतीक तुळसानी (ठाणे) — ११-५, ११-७, ११-७
Table Tennis चा थरार! वर्धेत पुण्याच्या खेळाडूंचा डंका; रुचिता दारवटकर अन् ‘हे’ खेळाडू पुढील फेरीत
१७ वर्षांखालील मुली
उपांत्य फेरी :
स्वरा करमरकर (नाशिक) वि.वि. स्वरदा साने (पुणे) — ११-६, ६-११, ८-११, ११-४, ११-४
त्रिशा लुडबे (ठाणे) वि.वि. विनया वधान (ठाणे) — ११-५, ११-६, ११-७
अंतिम फेरी :
स्वरा करमरकर (नाशिक) वि.वि. त्रिशा लुडबे (ठाणे) — ११-४, ११-५, ९-११, ६-११, ११-०