
T20 World Cup 2026: Bangladesh's arrogance continues! Visa denied to an Indian ICC official.
Bangladesh denies visa to ICC official :टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या मेगा स्पर्धेला काहीच दिवस शिल्लक आहेत, परंतु या स्पर्धेभोवतीचा वाद अजून देखील सुरूच आहे. २०२६ च्या आयसीसी टी-२० विश्वचषकात बांगलादेशच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. काही दिवसांतच सुरू होणाऱ्या या स्पर्धेत खेळण्यासाठी बांगलादेश संघ भारतात जाणार की या बाबत अद्याप काही एक चित्र स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा : IND vs NZ, 3rd ODI : भारताला फिरकी रणनीतीचा विचार करावा लागणार; दोन सामन्यात फिरकी गोलंदाजांकडून निराशा
आयसीसीकडून या समस्येचे निराकरण करण्यासाठी दोन अधिकारी बांगलादेशला पाठवण्याचे नियोजन करण्यात आले होते.मात्र, त्याला मोठा झटका बसला आहे. बांगलादेशने भारतीय वंशाच्या अधिकाऱ्याला व्हिसा नाकारला असून आता या प्रकरणाला अधिकच वाढवले आहे. तथापि, एक अधिकारी बांगलादेशात दाखल झाला आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाशी चर्चा करण्यासाठी ढाकाला जाणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये दोन आयसीसी अधिकारी होते. या अधिकाऱ्यांपैकी एक भारतीय वंशाचा होता. त्यांच्यासोबत आयसीसीचे भ्रष्टाचार विरोधी युनिट आणि सुरक्षा प्रमुख अँड्र्यू एफग्रेव्ह देखील होते. तथापि, एका वृत्तानुसार, व्हिसाच्या विलंबामुळे भारतीय वंशाचे अधिकारी बांगलादेशला जाऊया शकले नाहीत. परिणामी, अँड्र्यू एफग्रेव्ह यांना एकट्यालाच ढाका येथे जावे लागले.
मुस्तफिजूर रहमानला बीसीसीआयच्या सुचनेनुसार आयपीएलमधून मुक्त करण्यात आले आहे. या निर्णयायानंतर करण्यात संपूर्ण वाद निर्माण झाला असल्याचे बोलले जात आहे. आयसीसी टी-२० विश्वचषकासाठी बांगलादेश भारतात चार लीग सामने खेळणार आहे.परंतु, खेळाडूंच्या सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेशकडून आयसीसीला ते सामने संयुक्त यजमान श्रीलंकेत हलवण्याची विनंती करण्यात आली. स्पर्धा सुरू होण्यास अद्याप वेळ कमी असल्याने, बांगलादेश भारतात खेळण्यास तयार आहे याची खात्री करण्यासाठी आयसीसी बीसीबीशी सतत संपर्कात आहे.
हेही वाचा : रणजी ट्रॉफी 2025-026 च्या दुसऱ्या फेरीपूर्वी मुंबईला झटका! ‘या’ स्टार फलंदाजाची स्पर्धेतून माघार
आता, अँड्र्यू एफग्रेव्ह आयसीसी आणि बीसीबीमधील चर्चेसाठी जबाबदार असून माजी ब्रिटिश पोलिस अधिकारी म्हणून, ते भारतातील खेळाडूंच्या सुरक्षेबाबत बांगलादेशी अधिकाऱ्यांना एक तपशीलवार योजना सादर करणार आहेत. आयसीसी विश्वचषक सुरू होण्यास काही दिवसच शिल्लक असताना, जर या चर्चा अनिर्णीत राहिल्या, तर स्पर्धेचे आयोजन मात्र धोक्यात येऊ शकते.