
हार्दिक पंड्याचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
गजनफरने केले कर्णधार ऋतुराजला आउट
Tata IPL 2026 Live CSK Vs MI Updates: सध्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात महामुकाबला सुरू आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड यांनी चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली. अखेर पहिल्यांदा फलंदाजी करून चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सला 208 रन्सचे टार्गेट दिले आहे. संजू सॅमसनने मुंबईविरुद्ध खणखणीत शकत लगावले आहे.
चेन्नई सुपर किंग्जची फलंदाजी
पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जकडून कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि शतकी खेळी करणारा संजू सॅमसन खेळण्यासाठी आले. दोघांनी चांगली सुरुवात केली. ऋतुराज गायकवाडला आज फॉर्म सापडला असे वाटत असतानाच त्याने आपली विकेट गमावली. ऋतुराज 14 चेंडूत 22 रन्स करून आउट झाला. संजू सॅमसनने एका बाजूने चेन्नईची बाजू सांभाळून धरली. त्याने शानदार शतक करत 101 रन्स केल्या.
ऋतुराज गायकवाड आउट झाल्यावर सरफराज खान मैदानात खेळण्यासाठी आला. पॉवर प्लेमध्ये संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड आणि सरफराज खानने 73 रन्स केल्या. सरफराज खान आक्रमक खेळी करत होता. मात्र मिशेल सॅंटनरने त्याला आउट केले. सरफराजने 14 रन्स केल्या. त्यानंतर शिवम दुबे देखील केवळ 5 रन्स करून आउट झाला. डेवाल्ड ब्रेव्हिस 21 रन्स करून आउट झाला. जसप्रीत बुमराहने कार्तिक शर्माची विकेट घेतली.
CSK Vs MI Live: मुंबई पलटण करणार बॉलिंग; वानखेडेची खेळपट्टी कोणाला साथ देणार?
मुंबई इंडियन्सची गोलंदाजी
मुंबई इंडियन्सकडून पहिली ओव्हर जसप्रीत बुमराहने टाकली. त्याने त्यामध्ये एक नो बॉल देखील टाकला. दुसरी ओव्हर स्वतः कर्णधार हार्दिक पंड्याने टाकली. मात्र मुंबईकडून दुसऱ्या ओव्हरमध्ये हार्दिकने देखील नो बॉल टाकला. त्यामुळे मुंबईची गोलंदाजी थोडीशी भरकटल्यासारखी दिसून येत होती. मिशेल सॅंटनरने सरफराज खानची विकेट घेतली. गजनफरने ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबेला आउट केले. तर अश्वनी कुमारने ब्रेव्हिसची विकेट घेतली.
मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम: रोहित शर्मा, दानिश मालेवार, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), शेरफेन रदरफोर्ड, मिचेल सँटनर, ए.एम. गझनफर, जसप्रीत बुमराह, अश्वनी कुमार.
IPL 2026: हाय-व्होल्टेज सामन्याआधी CSK ला मोठा धक्का; MI विरुद्ध ‘हा’ खेळाडू तडकाफडकी बाहेर?
चेन्नई सुपर किंग्जची संभाव्य टीम: संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), उर्विल पटेल, डेवाल्ड ब्रेविस, सरफराज खान, शिवम दुबे, मॅथ्यू शॉर्ट / एम.एस. धोनी, जेमी ओव्हरटन, अंशुल कंबोज, नूर अहमद, गुरजपनेत सिंग, मुकेश चौधरी / मॅट हेन्री