
DC Vs PBKS Live: पंजाबच्या 'किंग्ज'चा पराभवाचा 'चौकार'; दिल्लीच्या विजयाने Play Off चे गणित बिघडले
पंजाबने दिल्लीला दिलेले 211 रन्सचे टार्गेट
अक्षर पटेलची अर्धशतकी खेळी
दिल्ली कॅपिटल्सचा चौथा विजय
Tata IPL 2026 DC Vs PBKS Live Updates: आज हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना पार पडला. दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्वाचा होता. दिल्लीने प्रथम गोलंदाजी केली. श्रेयस अय्यरच्या पंजाबने 20 ओव्हर्समध्ये 210 रन्स करून दिल्लीला 211 रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा 3 विकेट्सने पराभव केला आहे.
दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी
दिल्ली कॅपिटल्सकडून 211 रन्सचा पाठलाग करण्यासाठी केएल राहुल आणि अभिषेक पोरेल मैदानात उतरले. मात्र या दोघांना दिल्ली कॅपिटल्सला चांगली सुरुवात करून देता आली नाही. केएल राहुल 9 आणि अभिषेक पोरेल 5 रन्स करून आउट झाला. त्यानंतर दिल्लीकहा डाव गडगडला. त्या पाठोपाठ साहिल पारेख 13 रन्स करून आउट झाला. तर स्टब्स 12 रन्सवर असताना रन आउट झाला. कर्णधार अक्षर पटेलने दिल्लीला विजय मिळवून देण्यासाठी चांगली झुंज दिली. अक्षर पटेल अर्धशतक करून मोठा फटका मारण्याच्या नादात आउट झाला. डेव्हिड मिलर 51 रन्स करून आउट झाला. माधव तिवारी, आशुतोष वर्मा यांनी शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये महत्वाची खेळी करून दिल्लील विजय मिळवून दिला आहे.
पंजाब किंग्जची गोलंदाजी
फलंदाजीत कौशल्य आणि आक्रमक खेळ दाखवल्यावर पंजाब किंग्जच्या गोलंदाजांनी देखील आपली जादू दाखवून दिली. अर्शदीप सिंगने केएल राहुलची विकेट पटकावली. तसेच त्याने साहिल पारेखला आउट केले. यश ठाकूरने अभिषेक पोरेलची विकेट घेतली. मार्कस स्टॉयनीसने कर्णधार अक्षर पटेलला आउट केले.
Captain masterclass under pressure 🫡 Axar Patel departs after a very important 56(30) 👏 Updates ▶️ https://t.co/wHhflKIvCR#TATAIPL | #KhelBindaas | #PBKSvDC pic.twitter.com/TZSJL8YPJh — IndianPremierLeague (@IPL) May 11, 2026
पंजाब किंग्जची फलंदाजी
पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना संघाकडून प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्या मैदानात उतरली. दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई या दोन्ही फलंदाजांनी करण्यास सुरुवात केली. या दोन्ही फलंदाजांनी तडाखेबंद खेळी केली. प्रियांश आर्याने शानदार अर्धशतक झळकावले. त्याला प्रभसिमरन सिंगने चांगली सुरुवात केली.
प्रियांश आर्य 56 रन्सची खेळी करून आउट झाला. तर प्रभसिमरन सिंग केवळ 18 रन्स करून आउट झाला. त्यानंतर खेळण्यासाठी कर्णधार श्रेयस अय्यर आणि कूपर कॉनली आले. त्यांनी पंजाबच्या धावसंख्येला आकार दिला. कर्णधार श्रेयस अय्यरने महत्वाची अशी अर्धशतकी खेळी केली. तर कूपर कॉनली 38 रन्स करून आउट झाला. मार्कस स्टॉयनीस 1 रन करून आउट झाला. तर शशांक सिंग शून्यावर आउट झाला.
DC Vs PBKS Toss: आज नाही तर कधीच नाही; अक्षर पटेलने जिंकला टॉस, घेतला ‘हा’ निर्णय
दिल्ली कॅपिटल्सची गोलंदाजी
दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांना पॉवर प्ले मध्ये पंजाब किंग्जविरुद्ध एकही विकेट मिळवता आली नाही. त्यानंतर मात्र अखेर दिल्लीला माधव तिवारीने प्रियांश आर्य आउट करून पहिली विकेट प्राप्त करून दिली. तर पाठोपाठ मुकेश कुमारने प्रभसिमरन सिंगला आउट केले. माधव तिवारीने कर्णधार कॉपर कॉनलीला आउट केले. मिशेल स्टार्कने शशांक सिंग आणि स्टॉयनीसची विकेट घेतली.
श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रियांश आर्य, हरनूर सिंग, प्रभसिमरन सिंग, मिचेल ओवेन, विष्णू विनोद, निहाल वढेरा, अजमतुल्ला उमरझाई, मार्को जॅनसेन, मुशीर खान, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, सूर्यांश शेडगे, अर्शदीप सिंग, झेवियर लोप्रीट, युज्वेर चॅलेट, युवेंद्र चॅलेट, युजर्सन लो. ब्रार, विजयकुमार वैशाक, यश ठाकूर, कूपर कोनोली, बेन द्वारशुईस, प्रवीण दुबे, पायला अविनाश आणि विशाल निषाद.
नुसता जाळ अन् धूर! Priyansh Arya ने लोळवलं; थंड हवेत दिल्लीच्या गोलंदाजांना फोडला घाम
अभिषेक पोरेल, लोकेश राहुल, नितीश राणा, समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, आशुतोष शर्मा, दुष्मंथा चमीरा, कुलदीप यादव, मुकेश कुमार, विपराज निगम, मिचेल स्टार्क, त्रिपुराणा विजय, डेव्हिड मिलर, आकिब नबी दार, पथुम नबी दार, पथुम निलगि, लुकान प्रिन्स, के. जेमिसन, अजय जाधव मंडल, माधव तिवारी, साहिल पारख, करुण नायर, टी नटराजन.