
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने
मुंबई इंडियन्सला आव्हान टिकवण्यासाठी विजय महत्वाचा
रोहित अन् धोनी खेळणार का याकडे लक्ष
Tata IPL 2026 MI Vs CSK Live Updates: आज चेपॉकच्या स्टेडियमवर वादळी सामना होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. चेन्नई सातव्या तर मुंबई इंडियन्स नवव्या स्थानी आहे. आजच्या सामन्याचा पीच रिपोर्ट जाणून घेऊयात. आज आयपीएलच्या हंगामातील 44 वा सामना होणार आहे. ऐतिहासिक एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने येणार आहेत.
चेपॉक स्टेडियम खेळपट्टी रिपोर्ट
चेन्नईचे चेपॉक मैदान हे परंपरेने फिरकीपटूंसाठी नंदनवन मानले जाते. मात्र यंदा या हंगामात खेळपट्टी वेगळ्या स्वरूपाची दिसून आली आहे. आता ही खेळपट्टी फलंदाजीसाठी उपयुक्त दिसून आली आहे. खेळपट्टी सपाट असल्याने चेंडू बॅटवर चांगल्या प्रकारे येत आहे, ज्यामुळे फलंदाजांना मोठे फटके मारणे सोपे जात आहे. रात्रीच्या वेळी मैदानात दव पडण्याची दाट शक्यता आहे. दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे आणि चेंडूवर पकड मिळवणे कठीण होऊ शकते. त्यामुळे टॉस जिंकून कोणत्याही संघाचा कर्णधार गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
IPL 2026: आज होणार पुन्हा थरार! चेन्नई सुपर किंग्ज भिडणार मुंबई इंडियन्सला, सीझनची Rival Match
आज होणार पुन्हा थरार!
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल २०२६ मध्ये आज शनिवारी, २ मे रोजी चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात सामना रंगणार आहे. हंगामातील ४४ वा सामना एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाईल, जिथे दोन्ही संघ आपले नशीब बदलून विजयाच्या मार्गावर परतण्याचा प्रयत्न करतील. याआधी खेळलेला सामना मुंबई चेन्नईविरूद्ध हरली आहे. त्यामुळे चेन्नईत मैदानावर मुंबई याचा बदला घेणार का हे पहावं लागणार आहे आणि आजचा हा सामना नक्कीच चाहत्यांसाठी खास ठरणार आहे.
चेन्नई आणि मुंबई यांच्यातील आमनेसामनेचा विक्रम
चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सने प्रत्येकी पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 40 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 21 MI ने जिंकले आहेत, तर CSK ने 19 जिंकले आहेत.
DC Vs RR Live: दिल्लीने ‘रॉयल्स’ची उडवली दाणादाण; ओपनर्सने लावली वाट, 7 विकेट्सने पराभूत
चेन्नई सुपर किंग्जची संभाव्य टीम: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, कार्तिक शर्मा, जेमी ओव्हरटन (ऑलराउंडर),अकील होसेन, नूर अहमद, अंशुुल कंबोज, गुरजपनीत सिंग, एम. एस. धोनी , आयुष म्हात्रे, उर्विल पटेल.
मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम: रोहित शर्मा, विल जॅक्स, हार्दिक पांड्या (कर्णधार), रायन रिकलटन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, नमन धीर, तिलक वर्मा, मिचेल सँटनर, अल्लाह गझनफर, जसप्रीत बुमराह , अश्वनी कुमार, दानिश मालेवार,