Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GT Vs RCB Pitch Report: गुजरात अन् बंगलोरला खुणावतेय ‘ते’ स्थान; एम. चिन्नास्वामीवर कोण मारणार बाजी?

IPL 2026: आतापर्यंत या मैदानावर 104 आयपीएलचे सामने खेळवले गेले आहेत. त्यापैकी 56 सामन्यांमध्ये दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला विजय मिळाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 24, 2026 | 03:45 PM
GT Vs RCB Pitch Report: गुजरात अन् बंगलोरला खुणावतेय 'ते' स्थान; एम. चिन्नास्वामीवर कॉन मारणार बाजी?

GT Vs RCB Pitch Report: गुजरात अन् बंगलोरला खुणावतेय 'ते' स्थान; एम. चिन्नास्वामीवर कॉन मारणार बाजी?

Follow Us
Follow Us:

गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आमने सामने
रजत पाटीदार आणि शुभमन गिलकडे सर्वांचे लक्ष
विराट कोहली विरुद्ध प्रसिद्ध कृष्णा रंगणार सामना

Tata IPL 2026 GT Vs RCB Live Updates: आज चाहत्यांना आयपीएलचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. दोन युवा कर्णधार आज आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. आरसीबीचे (RCB Vs GT) नेतृत्व रजत पाटीदार तर गुजरातचे नेतृत्व शुभमन गिल करत आहे. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या खेळपट्टीचा अहवाल जाणून घेऊयात.

आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये आघाडी घेण्यासाठी आज दोन्ही संघ प्रयत्नशील असतील. आरसीबीचा संघ तिसऱ्या स्थानी तर गुजरातचा संघ 7 व्या स्थानी आहे. त्यामुळे आजचा सामना खास करून गुजरात टायटन्ससाठी महत्वाचा असणार आहे.

काय आहे आजचा पीच रिपोर्ट?

बंगळुरूचे एम. चिन्नास्वामी स्टेडियम हे फलंदाजांसाठी नंदनवन मानले जाते. 2026 च्या हंगामातही येथे मोठे स्कोअर पाहायला मिळाले आहेत.ही खेळपट्टी अत्यंत सपाट आणि कडक आहे, ज्यामुळे चेंडू बॅटवर व्यवस्थित येतो. फलंदाज पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फटके खेळू शकतात. सुरुवातीच्या 2-3 ओव्हर्समध्ये वेगवान गोलंदाजांना थोडी मदत मिळू शकते. परंतु त्यानंतर फलंदाजांचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे फिरकीपटूंना धावा रोखणे कठीण जाऊ शकते.

IPL 2026 च्या Playoff मध्ये कशी पोहचू शकते मुंबई इंडियन्सची टीम, कसे आहे समीकरण

आतापर्यंत या मैदानावर 104 आयपीएलचे सामने खेळवले गेले आहेत. त्यापैकी 56 सामन्यांमध्ये दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला विजय मिळाला आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे.आजचा सामना हाय-स्कोअरिंग होण्याची शक्यता आहे. विराट कोहली आणि शुभमन गिल यांसारख्या दिग्गज फलंदाजांसाठी ही खेळपट्टी रन मशीनसारखी असणार आहे.

दोन्ही संघांची सद्यस्थिती

आतापर्यंत 6 सामन्यांपैकी 4 विजय मिळवून पॉईंट्स टेबलमध्ये आरसीबी तिसऱ्या स्थानावर आहे. आजचा सामना त्यांनी जिंकल्यास ते ठेत दुसऱ्या स्थानावर जाऊ शकणार आहेत. तर गुजरात टायटन्स 6 पैकी 3 सामने जिंकला आहे. तो सध्या पॉईंट्स टेबलमध्ये 7 व्या स्थानी आहे. गुजरातचा कर्णधार उत्तम फॉर्ममध्ये असून त्याने ५ डावात २६५ धावा केल्या आहेत.

IPL 2026: भर मैदानात तिलक वर्मा आणि जेमी ओवरटनमध्ये उडाला ‘खटका’, Live Match मध्ये करावी लागली मध्यस्थी, Viral Video

गुजरातचा प्रसिध कृष्णा हा गोलंदाज सध्या ‘पर्पल कॅप’च्या शर्यतीत असून त्याने आतापर्यंत 11 विकेट्स घेतल्या आहेत. घरच्या मैदानावर खेळत असल्याने आरसीबीचे पारडे जड मानले जात आहे. मात्र, गुजरातच्या गोलंदाजांनी सुरुवातीचे बळी घेतले तर सामना कोणाहीकडे झुकू शकतो.रजत पाटीदार विरुद्ध शुभमन गिल अशी ही युवा कर्णधारांची लढत क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे

Web Title: Tata ipl 2026 live updates rcb vs gt virat kohli pitch report updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • IPL 2026
  • RCB vs GT
  • Shubhman Gill
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

हँडशेक वादावर ट्रॅव्हिस हेडचा खुलासा; म्हणाला, ‘Virat सोबत पॅच-अपची गरज…’
1

हँडशेक वादावर ट्रॅव्हिस हेडचा खुलासा; म्हणाला, ‘Virat सोबत पॅच-अपची गरज…’

जंतर-मंतर विद्यार्थी आंदोलनाला Virat Kohli चे समर्थन? व्हायरल ट्विटमुळे गोंधळ; सत्य आलं समोर
2

जंतर-मंतर विद्यार्थी आंदोलनाला Virat Kohli चे समर्थन? व्हायरल ट्विटमुळे गोंधळ; सत्य आलं समोर

धक्कादायक अन् भीषण! ICC World Cup 2027 मध्ये रोहित-विराटला डच्चू? अभिनव मुकुंदनुसार कशी असणार टीम?
3

धक्कादायक अन् भीषण! ICC World Cup 2027 मध्ये रोहित-विराटला डच्चू? अभिनव मुकुंदनुसार कशी असणार टीम?

‘…त्यांना सहजपणे बाहेर करता येणार नाही’; Virat Kohli- Rohit Sharma वर आर. अश्विनचे मोठे भाष्य
4

‘…त्यांना सहजपणे बाहेर करता येणार नाही’; Virat Kohli- Rohit Sharma वर आर. अश्विनचे मोठे भाष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.