SRH vs RCB Live Scorecard (फोटो- ians)
आयपीएलच्या महासंग्रामाला आजपासून सुरुवात
एम. चिन्नास्वामी स्टेडियम थोड्याच वेळात होणार सामना
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध सनरायजर्स हैद्राबादमध्ये सामना
Tata IPL 2026 SRH Vs RCB Live Match: थोड्याच वेळात बंगलोरच्या एम. चिन्नास्वामी (IPL 2026) स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात थोड्याच वेळात सामना सुरू होणार आहे. दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार रजत पाटीदारने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. थोड्याच वेळात सामना सुरू होणार आहे. बंगलोरचे स्टेडियम फलंदाजीसाठी उत्तम असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे आरसीबीचा चेस करण्याचा निर्णय योग्य ठरणार की नाही ते थोड्याच वेळात कळणार आहे.
Dialling up the intensity! 🔋#RCB & #SRH are READY for Match No.1️⃣ of #TATAIPL 2026 🔥#RCBvSRH | #KhelBindaas pic.twitter.com/X2VNONcz0C — IndianPremierLeague (@IPL) March 28, 2026
जोश हेजलवूड पहिल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादविरुद्ध खेळणार नाहीये. त्यामुळे गोलंदाजीची धुरा भुवनेश्वर कुमारवर असल्याचे म्हटले जात आहे. आजचा सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामन्याचा टॉस होणार आहे. तर 8 वाजता प्रत्यक्ष सामना सुरू होणार आहे. दरम्यान दोन्ही संघ मजबूत स्थितीत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या दोघांच्या संघात आज कोण कोण खेळू शकते याबाबत माहिती जाणून घेऊयात.
सनरायजर्स हैद्राबाद संघाची फलंदाजी मजबूत असल्याचे मागील वर्षी दिसून आले. ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली होती. आता त्यांना फॉर्म मध्ये असणाऱ्या इशान किशनची देखील साथ मिळणार आहे. मागील वर्षी हैद्राबादच्या संघाने बंगलोरच्या संघाविरुद्ध 231 धावांचा डोंगर उभा केला होता. इशान किशनने यामध्ये 94 धावांची तूफान खेळी केली होती.
IPL 2026: येणार Bumrah म्हणून बाकीचे होणार गुमराह? ‘त्या’ बातमीने उडाली झोप; नेमका विषय काय?
9 वर्षांनंतर RCB विरुद्ध SRH भिडणार
तब्बल 9 वर्षांची या आयपीएलची सुरुवात बंगलोर विरुद्ध हैदराबाद अशी होणार आहे. 2017 मध्ये आयपीएलची सुरुवात हैदराबाद विरुद्ध बंगलोर अशी झाली होती. 2017 मध्ये हैदराबादच्या संघाने बंगलोरला फायनलमध्ये हरवले होते. तर यंदा बंगलोरचा संघ गतविजेता म्हणून मैदानात उतरेल. 9 वर्षांमध्ये दोन्ही संघात अनेक बदल झाले आहेत. काही खेळाडू देखील बदलले गेले आहेत. 2017 मध्ये वेळेस बंगलोरच्या संघात ट्रेविस हेड देखील सामील होता. तर भुवनेश्वर कुमार हैदराबादच्या संघात सामील झाला होता.
IPL 2026: राडा निश्चित! 9 वर्षांनंतर RCB विरुद्ध SRH भिडणार; ‘या’ जबरदस्त खेळाडूंची अदलाबदली
एसआरएच: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (C/WK), नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, हर्षल पटेल, लियाम लिव्हिंगस्टोन, झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट, ब्रायडन क्रास, हर्ष दुबे, इशान मलिंगा
आरसीबी: फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (C), जितेश शर्मा (WK), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी, वेंकटेश अय्यर, रसिक डार






