Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI Vs LSG Live: मुंबई पलटणने मारली बाजी; लखनौवर 6 विकेट्सने विजय, पॉईंट्स टेबलमध्ये थेट…

एलएसजीने दिलेल्या 229 रन्सचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सकडून रियान रिकल्टन आणि रोहित शर्मा सलामीला खेळण्यासाठी मैदानात उतरले. रोहित शर्मा आणि रियान रिकल्टनने मुंबई इंडियन्सला पॉवर प्लेमध्ये चांगली सुरूवात करून दिली.

  • By तेजस भागवत
Updated On: May 04, 2026 | 11:26 PM
MI Vs LSG Live: मुंबई पलटणने मारली बाजी; लखनौवर 6 विकेट्सने विजय, पॉईंट्स टेबलमध्ये थेट…
Follow Us
Close
Follow Us:

एलएसजीने मुंबई इंडियन्सला 229 रन्सचे टार्गेट 
निकोलस पूरन आणि मिशेल मार्शने जबरदस्त खेळी 
मुंबई इंडियन्सचा हंगामातील तिसरा विजय 

Tata IPL 2026 MI Vs LSG Live Updates: आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्समध्ये सामना पार पडला. आज पलटणचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र तो निर्णय काहीसा महागडा ठरला असे पाहायला मिळाले. एलएसजीने प्रथम फलंदाजी करून मुंबई इंडियन्सला 229 रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर या सामन्यात मुंबई इंडियन्सने एलएसजीचा 6 विकेट्सने पराभव केला आहे. मुंबईने या हंगामातील आपला तिसरा विजय मिळवला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात मुंबईला यश प्राप्त झाले आहे.

मुंबई इंडियन्सची फलंदाजी

एलएसजीने दिलेल्या 229 रन्सचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सकडून रियान रिकल्टन आणि रोहित शर्मा सलामीला खेळण्यासाठी मैदानात उतरले. रोहित शर्मा आणि रियान रिकल्टनने मुंबई इंडियन्सला पॉवर प्लेमध्ये चांगली सुरूवात करून दिली. मुंबई इंडियन्सकडून रियान रिकल्टनने आणि रोहित शर्माने चांगली सुरुवात केली. पॉवर प्लेमध्ये मुंबई इंडियन्सने धमाकेदार सुरुवात केली. रोहित शर्मा आणि रियान रिकल्टनने शतकी भागीदारी केली. या दोघांनी दणक्यात सुरुवात करून मुंबई इंडियन्सचा विजयाचा पाया रचला. नमन धीर आणि विल जॅक्सने मुंबईला विजय मिळवून दिला.

Manimaran Siddharth with 2⃣ important wickets 🙌 Will #LSG stage a comeback? 🤔 Updates ▶️ https://t.co/elXSOvaeig #TATAIPL | #KhelBindaas | #MIvLSG pic.twitter.com/iU91kBAF5p — IndianPremierLeague (@IPL) May 4, 2026

अखेर रियान रिकल्टनने 83 रन्सची आक्रमक खेळी केली. 83 रन्स करून तो आउट झाला. त्यानंतर तिलक वर्मा खेळण्यासाठी आला. रोहित शर्माने शानदार अर्धशतकी खेळी केली. अनेक सामन्यांमध्ये खेळू न शकलेल्या रोहितने आजच्या सामन्यात दमदार कमबॅक केले. रोहित शर्माने 44 चेंडूत 84 रन्सची शानदार खेळी केली. तिलक वर्मा लवकर आउट झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि नमन धीरने मुंबईचा विजयाचा मार्ग सुकर केला.

एलएसजीची गोलंदाजी

एलएसजीकडून आवेश खान, मोहसीन खान, मोहम्मद शामीने सुरुवात केली. मात्र 7 ओव्हरपर्यंत मुंबईच्या एकाही फलंदाजाला आउट करणे त्यांना जमले नाही. शतकी भागीदारी झालयावर मोहसीन खानने मुंबईची सलामीची जोडी फोडली. रियान रिकल्टनला 83 रन्सवर मोहसीन खानने आउट केले.

तो आला आणि त्यानं बडवलं! मुंबईच्या ‘राजा’चं जोरदार कमबॅक; Rohit Sharma चे शानदार अर्धशतक

लखनौ सुपर जायंट्सची फलंदाजी
मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर लखनौच्या संघाकडून मिशेल मार्श आणि जॉश इंग्लिस सलामीला खेळण्यासाठी मैदानात उतरले. दरम्यान जॉश इंग्लिस केवळ 13 रन्स करून आउट झाला. निकोलस पूरनने लखनौला चांगली सुरुवात करून दिली. त्याने 63 रन्सची खेळी केली. मिशेल मार्शने 44 रन्सची महत्वाची खेळी केली. कर्णधार ऋषभ पंत आजच्या सामन्यात देखील चांगली खेळी करू शकला नाही. 15 रन्स करून आउट झाला. तर अक्षत रघुवंशी 11 रन्स करून आउट झाला. शेवटच्या ओव्हर्समध्ये एडन मारक्रम आणि हिम्मत सिंग महत्वाची खेळी केली. एडन मारक्रमने 31 रन्स आणि हिम्मत सिंगने 40 रन्सची खेळी केली. त्यामुळे लखनौने 228 रन्सपर्यंत मजल मारली आहे. मुंबईला या हंगामातील तिसऱ्या विजयासाठी 229 रन्सची आवश्यकता असणार आहे.

मुंबई इंडियन्सची गोलंदाजी

मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराह आणि दीपक चाहरने सुरुवात केली. मात्र वेगवान गोलंदाजांना मदत मिळणाऱ्या पीचवर ए.एम. गझनफरने मुंबई इंडियन्सला पहिली विकेट मिळवून दिली.  त्याने जॉश इंग्लिसला आउट केले. कॉर्बिन बॉशने अर्धशतकी खेळी करून सेट झालेल्या निकोलस पूरनला आउट केले. विल जॅक्स या पार्ट टाइम स्पिनरने कर्णधार पंतची विकेट घेतली. तर कॉर्बिन बॉश मिशेल मार्शला आउट केले. रघू शर्माने अक्षत रघुवंशीला आउट केले.

MI Vs LSG Live: मिशेल अन् पूरनने काढली हवा; लखनौने पलटणला दिले 229 रन्सचे टार्गेट

मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम: रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), विल जॅक्स, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या कर्णधार), ट्रेंट बोल्ट, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, क्विंटन डी कॉक, दानिश मालेवार.

एलएसजीची टीम: जोश इंग्लिश, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), निकोलस पूरन, एडेन मार्करम, आयुष बदोनी, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, मयंक यादव / मोहसीन खान, शाहबाज अहमद / अर्शीन कुलकर्णी.

Web Title: Tata ipl 2026 mumbai indians rohit sharma beat lsg by 6 wickets latest updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 11:23 PM

Topics:  

  • IPL 2026
  • MI vs LSG
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

RCB Beat MI: मुंबई इंडियन्सचा ‘गेम ओव्हर’! आरसीबीने तोंडातील घास हिरावला, २ गडी राखून मिळवला शानदार विजय
1

RCB Beat MI: मुंबई इंडियन्सचा ‘गेम ओव्हर’! आरसीबीने तोंडातील घास हिरावला, २ गडी राखून मिळवला शानदार विजय

MI vs RCB Live Score: भुवीच्या भेदकमाऱ्या पुढे मुंबईचे फलंदाज हतबल! RCB समोर १६७ धावांचे आव्हान; तिलक वर्माची ५७ धावांची खेळी
2

MI vs RCB Live Score: भुवीच्या भेदकमाऱ्या पुढे मुंबईचे फलंदाज हतबल! RCB समोर १६७ धावांचे आव्हान; तिलक वर्माची ५७ धावांची खेळी

CSK Beat LSG: चेपॉकवर ‘यलो आर्मी’चा थरारक विजय! उर्विल पटेलच्या ऐतिहासिक वादळापुढे लखनौ पराभूत; चेन्नईचा ५ गडी राखून विजय
3

CSK Beat LSG: चेपॉकवर ‘यलो आर्मी’चा थरारक विजय! उर्विल पटेलच्या ऐतिहासिक वादळापुढे लखनौ पराभूत; चेन्नईचा ५ गडी राखून विजय

CSK vs LSG Live Score: जोश इंग्लिसची वादळी खेळी! चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई करत लखनौने उभारलं 204 धावांचं आव्हान
4

CSK vs LSG Live Score: जोश इंग्लिसची वादळी खेळी! चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई करत लखनौने उभारलं 204 धावांचं आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.