
IPL 2026 चा थरार! वर्माचा विजयी 'तिलक; पलटणकडून PBKS चा पंचनामा, किंग्जचे टेंशन वाढले
पंजाब किंग्जचे मुंबईला 201 रन्सचे टार्गेट
तिलक वर्माचे शानदार अर्धशतक
मुंबई इंडियन्सचा चौथा विजय
Tata IPL 2026 MI Vs PBKS Live Updates: आज धरमशाळा येथील जगप्रसिद्ध क्रिकेट स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्जमध्ये सामना झाला. हा सामना पंजाब किंग्जसाठी महत्वाचा होता. पंजाबने (IPL 2026) प्रभसिमरन सिंगच्या खेळींच्या जोरावर मुंबई इंडियन्सला 201 रन्सचे टार्गेट दिले होते. तिलक वर्माने शानदार खेळी केली. अखेर या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा 6 विकेट्सने पराभव केला.
मुंबई इंडियन्सची फलंदाजी
पंजाबने दिलेल्या 201 रन्सचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी मुंबई इंडियन्सकडून रियान रिकल्टनने आणि रोहित शर्माने सुरुवात केली. या दोघा सलामीवीरांनी मुंबईला अत्यंत मजबूत अशी सुरुवात करून दिली. मात्र रियान रिकल्टनने 48 रन्सची शानदार खेळी केली. नमन धीरने 8 रन्सची लहानशी खेळी केली. रोहित शर्माने 25 रन्सची खेळी केली. मुंबई इंडियन्सचा विजय अवघड झाला असताना तिलक वर्माने डाव सांभाळला. त्याने संयमी खेळी करत अर्धशतक लगावले. तिलक वर्माने 33 बॉलमध्ये 75 रन्सची खेळी केली.
PBKS VS MI Live: शार्दुलने रोखले पण प्रभसिमरनने रडवले; मुंबईला विजयासाठी 201 रन्सची गरज
पंजाब किंग्जची गोलंदाजी
पंजाबच्या गोलंदाजांना पॉवर प्लेमध्ये मुंबईच्या सलामीवीरांना आउट करता आले नाही त्यानंतर अझमतुल्ला उमरझाईने रियान रिकल्टनची विकेट घेतली. तर मार्को जानसेनने मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नांमध्ये असणाऱ्या नमन धीरला आउट केले. युझवेंद्र चहलने रोहित शर्माला आउट केले.
पंजाब किंग्जची फलंदाजी
मुंबई इंडियन्सने पंजाबला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. पंजाब किंग्जकडून प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य यांनी सुरूवात केली. प्रियांश आर्यने चांगली सुरुवात केली. मात्र तो 22 रन्स करून आउट झाला. त्यानंतर प्रभसिमरन सिंग आणि कूपर कॉनली यांनी पंजाबचा डाव सांभाळला. प्रभसिमरन सिंग 57 रन्सची अर्धशतकी खेळी करून आउट झाला. कूपर कॉनली 21 रन्स करून आउट झाला. कर्णधार श्रेयस अय्यर आज चांगली खेळी करू शकली नाही. श्रेयस अय्यरने ४ रन्स केल्या. सुयश शेडगेने 8 रन्सची खेळी केली. शशांक सिंगने तर जानसनने 2 रन्स केल्या. तर ओमरझाईने महत्वाच्या 38 रन्सची खेळी केली.
Tilak Varma and Will Jacks racing #MI to the finish line 🏎️ Updates ▶️ https://t.co/idtc2OTLbP#TATAIPL | #KhelBindaas | #PBKSvMI pic.twitter.com/QznK4Mdkwy — IndianPremierLeague (@IPL) May 14, 2026
मुंबई इंडियन्सची गोलंदाजी
मुंबई इंडियन्सचे नेतृत्व आज जसप्रीत बुमराह करत आहे. मुंबईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबच्या सलामीच्या जोडीला रोखण्याचे मुख्य आव्हान मुंबईसमोर होते. नमन धीरने 5 रन्सवर असताना प्रभसिमरनचा कॅच सोडला. मात्र दीपक चाहरने 22 रन्सवर खेळणाऱ्या प्रियांश आर्यला आउट केले. शार्दुल ठाकूरने 4 महत्वाच्या विकेट्स घेतल्या आहेत. राज बावाने देखील 1 विकेट घेतली.
पंजाब किंग्स : श्रेयस अय्यर (कर्णधार),प्रियांश आर्य , हरनूर सिंग, प्रभसिमरन सिंग, मिचेल ओवेन, नेहल वढेरा, अजमतुल्लाह उमरजई, मार्को यानसन ,मुशीर खान. शशांक सिंग, मार्कस स्टोइनिस, सूर्यांश शेडगे,अर्शदीप सिंग, जेवियर बार्टलेट, युजवेंद्र चहल, लॉकी फर्ग्यूसन, हरप्रीत बराड़, विजयकुमार विशाक, यश ठाकुर, कूपर कोनोली, बेन ड्वार्शियस, पाइला अविनाश, विष्णू विनोद, प्रवीण दुबे, विशाल निषाद.
MI Vs PBKS Pitch Report: पलटण सूड घेणार की ‘किंग्ज’ मैदान मारणार? पहा धर्मशाळाचा पीच रिपोर्ट
मुंबई इंडियन्स: हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, नमन धीर, शेरफेन रदरफोर्ड, रयान रिकेल्टन, विल जॅक, कॉर्बिन बॉश, तिलक वर्मा, ट्रेंट बोल्ट, अश्विनी कुमार, जसप्रीत बुमराह, दीपक चाहर, मयंक मारकंडे, शार्दुल ठाकूर, क्विंटन डीकॉक, दानिश मालेवार, ए. एम. गझनफर, मयंक रावत, रघु शर्मा, मोहम्मद सलाउद्दीन इझहार.