
चेन्नई सुपर किंग्जचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
साई सुदर्शन आणि शुभमन गिलने केली सुरुवात
गुजरातच्या ओपनर्सकडून चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई
Tata IPL 2026 GT Vs CSK Live: सध्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरातटायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामना सुरू आहे. आयपीएलचा थरार अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. चेन्नईने या सामन्यात प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. गुजरात आज आपल्या होमग्राऊंडवर खेळत आहे. दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्वाचा आहे. अखेर या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जला 230 रन्सचे टार्गेट दिले आहे.
गुजरात टायटन्सची फलंदाजी
आजचा सामना गुजरात टायटन्ससाठी देखील महत्वाचा आहे. चेन्नईने फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केल्यावर गुजरात टायटन्सकडून ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत असणारा साई सुदर्शनने सुरुवात केली. त्याच्यासोबत कर्णधार शुभमन गिल मैदानात खेळण्यासाठी आला. पॉवर प्लेमध्ये गिल आणि सुदर्शनने गुजरातला आक्रमक सुरुवात करून दिली. शुभमन गिल आणि साई सुदर्शनने आपला फॉर्म कायम राखला आहे. शुभमन गिलने 64 रन्सची तडाखेबंद खेळी केली. साई सुदर्शन 84 रन्स करून आउट झाला.
GT Vs CSK Live: गुजरातची धाकधूक वाढली! ऋतुराजने टायटन्सविरुद्ध टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय
चेन्नई सुपर किंग्जची गोलंदाजी
चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांना आज अचूक गोलंदाजी करता आली नाही. सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये त्यांना विकेट मिळवता आले नाही. पॉवर प्लेमध्ये चेन्नईच्या गोलंदाजांनी तब्बल 70 रन्स दिले. स्पेन्सर जॉन्सनने कर्णधार शुभमन गिलला आउट केले. अंशूल कंबोजने साई सुदर्शनला आउट केले. तर राहुल तेवतिया रन आउट झाला. मुकेश चौधरीने सुंदरला आउट केले.
दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जच्या संघासाठी देखील आजचा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे. क्वालिफाय करायचे असल्यास आजचा सामना चेन्नईला जिंकावेच लागणार आहे. मात्र क्वालिफाय होण्यासाठी चेन्नईला दुसऱ्या संघांवर अवलंबून राहावे लागणार आहे. आजचा सामना चेन्नई सुपर किंग्जला मोठे फरकाने जिंकावा लागणार आहे. चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करत आहे. तर गुजरातचे नेतृत्व शुभमन गिल करत आहे. शुभमन गिल, साई सुदर्शन, मोहम्मद सिराज, राशीद खान सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. गुजरातच्या संघाने क्वालिफाय केले आहे. मात्र आजचा सामना गुजरातने जिंकल्यास तयांचे टॉप 2 मधले स्थान निश्चित होऊ शकते.
💯 partnership 🆙 The #GT openers are putting on a show 🍿 Updates ▶️ https://t.co/p5TP9NLREX #TATAIPL | #KhelBindaas | #GTvCSK pic.twitter.com/263cbwGgcI — IndianPremierLeague (@IPL) May 21, 2026
गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (विकेटकीपर), निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, राशीद खान, अरशद खान, कागिसो रबाडा, साई किशोर, मोहम्मद सिराज.
IPL 2026: याला म्हणतात थरार! जागा 1 अन् सामने 5; कोणाला मिळणार IPL 2026 च्या प्लेऑफचे तिकीट?
चेन्नई सुपर किंग्स : संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), उर्विल पटेल, कार्तिक शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, प्रशांत वीर, अकील हुसेन, नूर अहमद, अंशुल कंबोज, स्पेन्सर जॉन्सन.