Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI vs RR Live: चाहत्यांच्या उत्साहावर पाणी फिरणार; पावसामुळे सलग दुसरा सामना रद्द होणार?

पाऊस किती वेळ सुरू राहतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाऊस लवकर थांबला तर सामना कधी सुरू होणार याची उत्सुकता असेल आणि नियमानुसार किती ओव्हर्सचा खेळ होणार हे पहावे लागणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 07, 2026 | 08:36 PM
MI vs RR Live: चाहत्यांच्या उत्साहावर पाणी फिरणार; पावसामुळे सलग दुसरा सामना रद्द होणार?

MI vs RR Live: चाहत्यांच्या उत्साहावर पाणी फिरणार; पावसामुळे सलग दुसरा सामना रद्द होणार?

Follow Us
Follow Us:

गुवाहाटीमध्ये जोरदार पावसाला सुरवात 
मुंबई विरुद्ध राजस्थान मॅचच्या टॉसला विलंब 
सलग दूसरा सामना रद्द होण्याचा अंदाज

MI vs RR Weather Updates: आयपीएलचा थरार सुरू होऊन एक आठवडा होऊन गेला आहे. आज गुवाहाटीमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात मॅच होणार आहे. मात्र गुवाहाटीत जोरदार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे मुंबई आणि राजस्थानमधला (MI vs RR) सामना पावसामुळे रद्द होतो की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.

संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होणार होता. मात्र पाऊस सुरू असल्याने अद्याप मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघांमध्ये टॉस देखील झालेला नाही. आता पाऊस किती वेळ सुरू राहतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाऊस लवकर थांबला तर सामना कधी सुरू होणार याची उत्सुकता असेल आणि नियमानुसार किती ओव्हर्सचा खेळ होणार हे पहावे लागणार आहे.

झालं, सगळं संपणार? MI Vs RR सामना रद्द होणार? गुवाहाटीत रन्सचे वादळ नव्हे तर…

गुवाहाटी आणि स्टेडियम असलेल्या परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे स्टेडियमची खेळपट्टी आणि बाकीचे मैदान झाकण्यात आले आहे. मैदानावर पाणी साठले असल्याचे समोर येत आहे. तेथील पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र पावसाचा जोर कमी झालेला नाही. पाऊस सुरूच आहे. त्यामुळे तिथे काम करताना अडचण निर्माण होत आहे. आता पाऊस कधी थांबणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाऊस वेळेत थांबला तर नियमानुसार सामना होणार की नाही हे देखील पहावे लागणार आहे. सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण दिला जाईल.

मुंबई विरुद्ध राजस्थान पीच रिपोर्ट

बरसपारा क्रिकेट स्टेडीयमची खेळपट्टी फलंदाजीसाठी नंदनवन मानली जाते. या ग्राऊंडवर मोठी धावसंख्या उभी करणे शक्य आहे. प्रथम फलंदाजी करताना 155 ते 165 धावसंख्या अंदाजे आहे. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना 145 ते 155 धावसंख्या अंदाजे आहे. त्यामुळे टॉस जिंकून कोणताही संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता जास्त आहे.

MI Vs RR Pitch Report: मुंबई विरुद्ध राजस्थान रॉयल्स मॅचवर पावसाचे सावट? पहा पीच रिपोर्ट

मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम: रोहित शर्मा, रायन रिकलटन , सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, हार्दिक पांड्या (कर्णधार), शेरफेन रदरफोर्ड,मिचेल सँटनर,  शार्दुल ठाकूर, ट्रेंट बोल्ट, कॉर्बिन बॉश, जसप्रीत बुमराह.

राजस्थान रॉयल्सची संभाव्य टीम: यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, शिम्रोन हेटमायर, रियान पराग (कर्णधार), रवींद्र जडेजा, डॅशुन शनाका, डोनोवन फरेरा,  जोफ्रा आर्चर, तुषार देशपांडे, रवी बिष्णोई, नांद्रे बर्गर, युधवीर सिंह

Web Title: Tata ipl live mi vs rr match chance to cancel due to heavy rain 2026 sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 08:30 PM

Topics:  

  • Guwahati
  • IPL 2026
  • MI vs RR
  • Rain News

संबंधित बातम्या

ऑक्टोबर महिनाअखेर कोकण किनारपट्टीवर पावसाचे संकेत; दिवाळीच्या तोंडावर अधिक पावसाचा अंदाज व्यक्त
1

ऑक्टोबर महिनाअखेर कोकण किनारपट्टीवर पावसाचे संकेत; दिवाळीच्या तोंडावर अधिक पावसाचा अंदाज व्यक्त

Weather Update : दक्षिण भारतातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; बिहारसह हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये तर…
2

Weather Update : दक्षिण भारतातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; बिहारसह हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये तर…

कोकणसह राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी
3

कोकणसह राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.