फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका : भारताच्या संघाने नुकतीच बांग्लादेशविरुद्ध T२० मालिका नावावर केली. टीम इंडियाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ३-० ने मालिका जिंकून स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध केलं. भारताच्या संघाचा पुढील आव्हान न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका रंगणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये ३ कसोटी सामान्यांची मालिका आयोजित करण्यात आली आहे. या मालिकेचे आयोजन भारतामध्ये केले जाणार आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारताचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारताचा संघासमोर साऊथ आफ्रिकेचे आव्हान असणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये T२० मालिकेचे आयोजन करण्यात येणार आहे.
भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यामध्ये T२० मालिका आयोजित करण्यात येणार आहे. या दोन्ही संघामध्ये ८ नोव्हेंबर रोजी पहिला T२० सामना आयोजित करण्यात आली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही खेळाडूंनी T२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारताच्या संघाची T२० फॉरमॅटची धुरा सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये शेवटचा सामना T२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यामध्ये झाला. यामध्ये भारताच्या संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून विश्वविजेता झाला. आता पुन्हा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमने सामने असणार आहेत. यावर एकदा नजर टाका.
भारतासाठी दक्षिण आफ्रिकेचे मोठे आव्हान असणार आहे. टीम इंडियाने विश्वचषकामध्ये एकही सामना न गमावता भारताचा संघ विश्वविजेता झाला होता. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने देखील एकही सामना न गमावता अंतिम फेरी गाठली होती त्यामुळे भारताच्या संघाविरुद्ध साऊथ आफ्रिका विश्वचषकातील बदला घेण्याचा प्रयत्न करेल. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये होणाऱ्या मालिकेच्या वेळापत्रकावर एकदा नजर टाका.