दिवाळीनिमित्त चेहऱ्यावर लावा जावेद हबीब यांनी सांगितलेला खास फेसपॅक
दिवाळी सणाला अवघे काही तास शिल्ल्क राहिले आहेत. दिवाळीच्या आधी घरात साफसफाई करून फराळातील पदार्थ बनवले जातात. सणावाराच्या दिवसांमध्ये सगळीकडे खूप जास्त घाई असते. त्यामुळे कामाच्या धावपळीमध्ये चेहऱ्याकडे लक्ष देण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. सतत काम करत राहिल्यामुळे चेहऱ्यावर अतिरिक्त तेल जमा होऊन त्वचा अतिशय चिकट आणि काळवंडल्यासारखी वाटू लागते. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेले वेगवेगळे फेशिअल आणि स्किन ट्रीटमेंट करून घेतात, ज्यामुळे त्वचा काही दिवसांपुरतीच सुंदर आणि चमकदार दिसते. मात्र कालांतराने पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते.(फोटो सौजन्य: Pinterest)
चेहऱ्यावरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी महागडे प्रॉडक्ट, फेशिअल, क्लीनअप इत्यादी अनेक गोष्टी करून घेतल्या जातात. पण तरीसुद्धा चेहऱ्यावर चमक येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी प्रसिद्ध तज्ज्ञ जावेद हबीब यांनी सांगितलेला घरगुती फेसपॅक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा फेसपॅक चेहऱ्यावर ग्लो आणेल आणि काळी झालेली त्वचा उजळदार करण्यासाठी मदत करेल. इन्स्टंट ग्लो आणि फ्रेशनेस मिळवण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा.
चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी कायमच महागड्या स्किन केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो आणि त्वचा अधिक सुंदर आणि उजळदार दिसू लागते. फेसपॅक बनवण्यासाठी वाटीमध्ये तुरटी पावडर घेऊन त्यात दही मिक्स करून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसाच ठेवून नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे चेहऱ्यावरील हरवेलला ग्लो पुन्हा वाढेल आणि तुम्ही सुंदर दिसाल. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा फेसपॅक चेहऱ्यावर लावावा.
चेहऱ्यावर आलेले काळे डाग किंवा पिंपल्स कमी करण्यासाठी तुरटीचा वापर करावा. तुरटीमध्ये नैसर्गिकरित्या अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे चेहऱ्यावर वाढलेले मुरूम आणि मोठे पिंपल्स कमी होतात. याशिवाय त्वचा आतून स्वच्छ होते. त्वचेमध्ये जमा झालेली बॅक्टरीया नष्ट करण्यासाठी तुरटी प्रभावी आहे. याशिवाय दह्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुरटी अतिशय प्रभावी ठरेल.