फोटो सौजन्य - प्रो कबड्डी सोशल मीडिया
प्रो कबड्डी लीग २०२४ : ज्याप्रकारे भारतामध्ये इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटला प्रेम दिले जाते. त्याचप्रमाणे चाहते प्रो कबड्डी लीगला सुद्धा प्रेम देत. भारतामध्येच नाही जगभरामध्ये टीम इंडियाचा कबड्डी संघाची चर्चा होते. प्रो कबड्डी लीग हे आयपीएल सारखेच भारतामध्ये आयोजित केले जाते. मुंबईतील प्रो कबड्डी लीग लिलावाच्या पहिल्या दिवशी अनेक खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. तर अनेक बड्या नावांना अपेक्षेप्रमाणे पैसे मिळाले नाहीत. काल महागडा खेळाडू म्हणून सचिनचे नाव पुढे आले. अ श्रेणीमध्ये समाविष्ट असलेल्या बचावपटू सचिनची मूळ किंमत ३० लाख रुपये होती, मात्र तामिळ थलायवासने त्याला २ कोटी १५ लाख रुपयांना खरेदी केले. कालच्या या लिलावामध्ये यूपी योद्धा आणि गुजरात जायंट्समध्ये सचिनसाठी जोरदार युद्ध सुरु होते. त्यानंतर तामिळ थलायवासने त्याला २ कोटी १५ लाख रुपयांना खरेदी केले.
प्रो कबड्डीचा स्टार खेळाडू पवन सेहरावतला तेलुगू टायटन्सने १ कोटी ७२ लाख ५० हजार रुपयांना विकत घेतले आहे. पवन सेहरावतसाठी ३० लाख रुपयांपासून बोली लागली होती. पवन सेहरावतला विकत घेण्यासाठी बेंगळुरू बुल्स आणि यू मुंबा यांच्यात जोरदार बोलीबाजी झाली परंतु त्याला तेलुगू टायटन्सने विकत घेतले. अष्टपैलू खेळाडू भरतला बी श्रेणीत यूपी योद्धाने १.३० कोटी रुपयांना विकत घेतले. यापूर्वी भरतची बोली २० लाख रुपयांपासून सुरू होती. तेलुगू टायटन्स आणि यूपी योद्धाने भरत जंकरसाठी बोली लावली, पण शेवटी यूपी योद्धाने भारतला १.३० कोटी रुपयांना साइन केले.
इराणचा अष्टपैलू मोहम्मदरेझा चियानेह शादलौईवर मोठ्या प्रमाणावर पैशांचा वर्षाव करण्यात आला. या खेळाडूची मूळ किंमत ३० लाख रुपये होती. हरियाणा स्टीलर्सने मोहम्मदरेझा चियानेह शादलौईला २ कोटी ७ लाख रुपयांना विकत घेतले. यू मुंबा आणि गुजरात जायंट्सने मोहम्मदरेझा चियानेह शादलौईवर पहिल्यांदा बोली लावली. यानंतर हरियाणात प्रवेश केला. जयपूर पिंक पँथर्सचा माजी कर्णधार सुनील कुमारला यू मुंबाने १ कोटी १ लाख ५० हजार रुपयांना विकत घेतले. श्रेणी A मध्ये समाविष्ट असलेल्या सुनीलची मूळ किंमत ३० लाख रुपये होती.