फोटो सौजन्य - रिस्पेक्टेड इंस्टाग्राम
टीम इंडिया : २६ जुलैपासून पॅरिस ऑलिम्पिकला (Paris Olympic 2024) सुरूवात होणार आहे. भारताकडून ११७ खेळाडू खेळणार आहेत. या ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाचे अनेक दिग्गज खेळाडू असणार आहेत. टोकीयो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवलेला निरज चोप्रा त्याचबरोबर ऑलिम्पिकमध्ये दोनंदा पदक जिंकणारी पीव्ही सिंधू, विश्वविजेती निखहत जरीन या खेळाडूंचा समावेश आहे. त्याचबरोबर अनेक खेळाडूचा चांगल्या स्तरावर असलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. २६ जूलैला भव्यदिव्य उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर पॅरिस ऑलिम्पिक पदक जे देण्यात येणार आहे त्याचे सुद्धा विशेष वैशिष्ट आहे. शुटींगचाही भारताने मोठा संघ पाठवला आहे.
आशिया स्पर्धेमध्ये भारताच्या खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली होती. यावेळी भारताच्या खेळाडूंनी १०० हुन अधिक पदक जिंकून इतिहास रचला होता. भारताच्या खेळाडूंनी आतापर्यत सर्वाधिक ७ पदके ऑलिम्पिकमध्ये जिंकली आहेत. यंदा भारताचे खेळाडू १० हुन अधिक पदक जिंकणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भारताचा संघ यावेळी १० हून अधिक पदक मिळवू शकतो. भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट ही काही काळापासून सातत्याने प्रयत्न करत आहे. भारताचे बॅडमिंटन स्टार जोडी चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रानकिरेड्डि यांच्याकडून भारताच्या आशा कायम आहेत. ही जोडी सध्या जागतिक स्तरावर तिसऱ्या स्थानावर आहे.
भारतचे पुरुष एकेरीमध्ये यंदा दोन खेळाडू लढणार आहेत. यामध्ये भारताचा एचएस प्रणॉय आणि लक्ष्य सेन हे दोघे भारतासाठी पुरुष सिंगल्समध्ये खेळणार आहेत. भारतीय फुटबॉल संघाचा विचार केला तर पुरुष आणि महिलाच्या कॅटेगिरीमध्ये दमदार खेळाडूंचा समावेश आहे. निशांत देव आणि निखत जरीन यांच्याकडून तर सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे. त्याचबरोबर टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारी लव्हलिना बोर्गोहेन सुद्धा तिच्या पदकाचा रंग बदलण्याचा प्रयत्न करेल.
टोकियोमध्ये रौप्य पदक मिळवणारी मीराबाई चानूचा डोळा नक्कीच यंदा सुवर्ण पदकावर असेल. शूटिंगचा विचार केला सर्वांच्या नजरा मनू भाकर हिच्यावर असणार आहेत. त्याचबरोबर पुरुषांमध्ये भारताचा एक कुस्तीपटू खेळणार आहे त्यामुळे अमन शेरावतवर भारताच्या नजरा असणार आहेत.