नसांमध्ये चिकटून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी नियमित खा 'हे' पदार्थ, विराट कोहलीच्या डाएटिशियनने दिलेला उपाय
कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणे?
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सोप्या टिप्स?
विराट कोहलीच्या डाएटिशियनने दिलेल्या टिप्स?
दैनंदिन आहारात सतत तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे रक्तात उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी झपाट्याने वाढते. रक्तात वाढलेले कोलेस्ट्रॉल शरीरासाठी अतिशय धोक्याचे आहे. यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येऊन मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात, एक म्हणे चांगले आणि वाईट. चांगले कोलेस्ट्रॉल रक्तात शरीरास आवश्यक असलेले फॅट निर्माण करतात, तर वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा करते. रक्तात जमा झालेला खराब कोलेस्ट्रॉल रक्तपुरवठ्यात अडथळे निर्माण करतो. रक्त पुरवठ्यात निर्माण झालेले अडथळे शरीराचा ऑक्सिजन प्रवाह कमी करतात. यामुळे शरीरातील अवयवांना व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रक्तात वाढलेले कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी कोणत्या पदार्थांचे नियमित सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. विराट कोहलीच्या डाएटिशियनने सांगितलेले हे पदार्थ शरीरासाठी अतिशय महत्वाचे आहेत.(फोटो सौजन्य – istock)
रोजच्या आहारात फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. फायबर युक्त पदार्थ खाल्ल्यास शरीराची पचनक्रिया सुधारते आणि शरीराला भरमसाट फायदे होतात. रोजच्या आहारात किमान १०-१५ ग्रॅम फायबर असलेले पदार्थ खावेत. ओट्स, बार्ली (जव), चिया सीड्स, गाजर, पपई इत्यादी पदार्थांमध्ये भरपूर फायबर असते. हे खाल्ल्यानंतर शरीरातील विषारी घटक सहज बाहेर पडून जातात.
गोड पदार्थ बनवल्यानंतर त्यात सुका मेवा आवडीने टाकला जातो. यामुळे पदार्थाची चव वाढते आणि शरीराला सुद्धा फायदे होतात. नियमित सकाळी नाश्त्यात बदाम, काजू, अक्रोड इत्यादी पदार्थ आवडीने खावेत. तसेच आहारात ‘स्टेरॉल्स’ आणि ‘स्टॅनॉल्स’ सारख्या वनस्पतीजन्य घटकांचा समावेश करावा. सुका मेवा, विविध फळांच्या बिया किंवा तृणधान्य खाल्ल्यास महिनाभरात फरक दिसून येईल. यामुळे रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.
दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी कायमच व्यायाम करणे आवश्यक आहे. शारीरिक हालचाली केल्यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होतात. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीकेवळ शारीरिक हालचाली करणे आवश्यक नसून नियमित ध्यान, व्यायाम आणि प्राणायाम करणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम केल्यामुळे केवळ वजन कमी होत नाहीतर फॅट मेटाबॉलिज्म सुधारण्यास मदत होते.
Ans: उच्च कोलेस्टेरॉलची सहसा कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, म्हणूनच याला "सायलेंट किलर" म्हटले जाऊ शकते.
Ans: पालेभाज्या, फळे, ओट्स, कडधान्ये, नट्स (बदाम, अक्रोड), आणि ओमेगा-३ युक्त पदार्थ खावेत.
Ans: दररोज ३० मिनिटे चालणे, धावणे, पोहणे किंवा योगासने केल्याने खराब कोलेस्टेरॉल कमी होण्यास आणि चांगले कोलेस्टेरॉल वाढण्यास मदत होते.






