देशी ब्रँड पुन्हा करणार धमाका! दमदार बॅटरी आणि तगड्या फीचर्ससह लवकरच लाँच करणार स्वस्त स्मार्टफोन, 7 हाजारांहून कमी असेल किंमत
लावाचा आगामी स्मार्टफोन Yuva Star 3 या नावाने लाँच केला जाईल, अशी शक्यता आहे. लीक झालेल्या पोस्टरवर विश्वास ठेवला तर या स्मार्टफोनच्या मागील बाजूला कर्व्ड एजसह मॅट फिनिश दिले जाण्याची शक्यता आहे. फोनच्या मागील बाजूला डुअल कॅमेरा सेटअप असू शकतो. याशिवाय, या स्मार्टफोनच्या मागील बाजूला LED फ्लॅश लाईट दिली जाण्याची शक्यता आहे. उजव्या बाजूला वॉल्यूम आणि पावर बटन दिले जाणार आहे. कंपनीचा आगामी स्मार्टफोन ब्लॅकव्यतिरिक्त आणखी काही रंगात लाँच केला जाण्याची शक्यता आहे. फोनच्या कोणत्याही फीचरबाबत अद्याप कंपनीकडून अधिकृतपणे घोषणा करण्यात आली नाही. मात्र लीक झालेल्या फोटोंवरून काही अंदाज वर्तवला जात आहे. (फोटो सौजन्य – X)
लीक झालेल्या रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर येत्या काही आठवड्यांत कंपनी त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये लाँच केला जाण्याती शक्यता आहे. त्यामुळे असा अंदाज आहे की, कंपनी त्यांचा आगामी स्मार्टफोन 7 हजार रुपयांहून कमी किंमतीत लाँच करू शकते. Lava Yuva Star 2 गेल्यावर्षी मे महिन्यात लाँच करण्यात आला होता. या स्मार्टफोनच्या मागील बाजूला पिल साइज वाला वर्टिकली अलाइंड कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 13MP चा मुख्य आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Lava Yuva Star 2 मध्ये Unisoc 9863 चिपसेटसह अँड्रॉईड 14 Go ऑपरेटिंग सिस्टम आहे. या बजेट स्मार्टफोनमध्ये 19W वायर्ड फास्ट चार्जिंग फीचरसह 5000mAh बॅटरी आहे. याव्यतिरिक्त, फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. लावाच्या या बजेट फोनमध्ये 6.75-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. येणाऱ्या लावा युवा स्टार 3 मध्ये चांगले कॅमेरा आणि बॅटरीसह अपग्रेड असण्याची अपेक्षा आहे.






