फोटो सौजन्य – X
सर्व फॉरमॅटमध्ये भारतासाठी परदेशात शतके ठोकणारे फलंदाज : भारताचे संघ हे सध्या इंग्लड दौऱ्यावर आहेत, भारतीय महिला संघाची सध्या टी20 मालिका सुरु आहे, तर पुरुष संघ कसोटी मालिका खेळत आहे. दोन्ही संघाचा पहिला सामना झाला आहे. यामध्ये पुरुष संघाच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर पहिल्या सामन्यात 5 शतक ठोकले तर काल झालेल्या महिला क्रिकेट टी20 पहिल्या सामन्यामध्ये भारताची कर्णधार स्मृती मनधना हिने कमालीची कामगिरी केली आणि मैदानावर कहर केला.
स्मृतीने मागील काही वर्षामध्ये सातत्याने कमालीचा खेळ दाखवला आहे, तिने टीम इंडीयासाठी चांगली कामगिरी केली आहे. आता ती भारतीय महिला क्रिकेटमध्ये परदेशामध्ये तीनही फाॅरमॅटमध्ये शतक ठोकणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे. या यादीमध्ये भारतीय क्रिकेटमध्ये तीनही फाॅरमॅटमध्ये परदेशात शतक झळकावणारे आणखी दोन खेळाडूंची नावे सामील आहेत.
सुर्याचा ऐतिहासिक कॅच, विराटची दमदार खेळी! या दिनी भारताच्या संघाने 11 वर्षानंतर जिंकला विश्वचषक
परदेशात तीनही फाॅरमॅटमध्ये शतक झळकावण्याच्या यादीमध्ये केएल राहुल देखील सामील आहे. त्याने देखील आंतरारष्ट्रीय स्तरावर तीनही फाॅरमॅटमध्ये शतक झळकावले आहेत. त्याचबरोबर रोहित शर्माने देखील हा पराक्रम केला आहे. त्याने देखील तीनही फाॅरमॅटमध्ये शतक ठोकले आहेत.
Maiden T20I Hundred for Smriti Mandhana! 💯 👌
What a knock from the captain & what a way to bring it up in style 👏
Updates ▶️ https://t.co/iZwkYt7Crg#TeamIndia | #ENGvIND | @mandhana_smriti pic.twitter.com/Gv2Yar5R4z
— BCCI Women (@BCCIWomen) June 28, 2025
स्मृती मानधना ही महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारी चौथी फलंदाज (पूर्ण सदस्य) ठरली आहे. या बाबतीत तिने मेग लॅनिंगची बरोबरी केली आहे. महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतकाचा विक्रम डिआंड्रा डॉटिनच्या नावावर आहे. २०१० मध्ये तिने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३८ चेंडूत शतक ठोकले. या यादीत टॅमी ब्यूमोंट दुसऱ्या आणि हरमनप्रीत कौर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, स्मृती मानधनाने ६२ चेंडूत ११२ धावांची खेळी केली. यादरम्यान तिने १५ चौकार आणि ३ षटकारही मारले. मानधनाच्या या शतकामुळे भारतीय महिला संघाने २० षटकांत ५ गडी गमावून २१० धावा केल्या. हरलीन डोअलने ४३ धावांची खेळी केली.