आशिया कप 2025 सुरु झाला आहे आणि आतापर्यत भारताचा पहिलाच सामना हा यूएईविरुद्ध झाला आहे. आशिया कपचे आतापर्यत तीन सामने यामध्ये दुबईमध्ये प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद पाहायला मिळाला. स्टेडियममध्ये सामन्याच्या वेळी प्रेक्षकांची गर्दी दिसली नाही. त्यामुळे आता भारताचा माजी खेळाडू याने स्टेडियममध्ये गर्दी नसल्याचे कारण स्पष्ट केले आहे. रविवारी आशिया कपमध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याची सर्व तिकिटे न विकण्याचे कारण माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी सांगितले आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीची अनुपस्थिती हे याचे एक मोठे कारण असल्याचे चोप्रा सांगितले आहे. आकाश चोफ्राने यासंदर्भात नक्की काय सांगितले याबाबतीत सविस्तर जाणून घ्या. चोप्रा म्हणाले की, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही चाहत्यांचे आवडते खेळाडू आहेत आणि चाहते त्यांना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये येतात. तथापि, त्यांच्या अनुपस्थितीचा परिणाम तिकीट विक्रीवर स्पष्टपणे दिसून येतो.
जेव्हा विराट कोहली रणजी ट्रॉफी सामना खेळण्यासाठी गेला होता तेव्हा स्टेडियम जवळजवळ भरले होते. त्याची अनुपस्थिती हे तिकिटे लवकर विकली जात नसण्याचे एक प्रमुख कारण आहे. चोप्रा यांनी निदर्शनास आणून दिले की यूएईमधील क्रिकेट चाहते स्टेडियम लवकर भरतात, परंतु यावेळी मैदाने रिकामी आहेत. बांगलादेश, भारत आणि अफगाणिस्तान यांनी त्यांचे सामने खेळले आहेत, परंतु स्टेडियममध्ये मोठी गर्दी नव्हती.
चोप्रा यांनी स्पष्ट केले की तिकिटांचे दर जास्त असल्याने असे नाही. आठवड्याच्या दिवशी सामना पाहण्यासाठी लोकांना स्टेडियममध्ये येण्यास त्रास होतो असे देखील नाही.
Akash Chopra: “Because Rohit and Kohli aren’t playing, the crowd isn’t showing up for the Asia Cup. Even in the England home series, ODI ratings were higher than T20Is. Looks like BCCI’s new poster boys are just social media superstars.” pic.twitter.com/LQqPXgCNP8
— ADITYA 🇮🇹 (@Wxtreme10) September 12, 2025
आकाश चोप्रा यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहली त्यांच्या खेळण्याच्या काळात कसे वेगळे दिसायचे याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, ‘जर हे दोन खेळाडू असते तर स्टेडियममध्ये दुप्पट गर्दी झाली असती. समजा सुरुवातीला ५,००० लोक आले असते, तर रोहित-कोहली खेळला असता तर प्रेक्षकांची संख्या किमान १० ते १५ हजार झाली असती. त्यांना प्रत्यक्ष पाहण्याची एक दुर्मिळ संधी मिळाली आणि त्यांच्या अनुपस्थितीचा हा परिणाम आहे.’
भारतीय संघाने आशिया कपमध्ये आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिल्या सामन्यात यूएईचा ९ विकेट्सने पराभव केला. आता टीम इंडियाचा सामना १४ सप्टेंबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होईल.