CSK vs RCB: Today there will be a clash between CSK and RCB at Chepauk: Know A to Z information about both the teams..
CSK vs RCB : इंडियन प्रीमियर लीगचा 18 वा हंगाम सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. आतापर्यंत आयपीएल 2025 मधील 7 सामने झाले आहेत. तर 8 वा सामना आज शुक्रवार (दि. 28 मार्च) चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळवला जाणार आहे. हा रोमांचक सामना चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे रंगणार आहे. दोन्ही संघांनी 18 व्या हंगामातील आपला पहिला सामना जिंकला आहे. आरसीबीने पहिल्या सामन्यात केकेआरचा 7 गडी राखून पराभव केला आहे तर चेन्नई सुपर किंग्ज संघाने मुंबई इंडियन्सचा 4 विकेट्स राखून पराभव करत पहिला सामना आपल्या नाव केला आहे.
चेन्नई आणि बंगळुरू यांच्यातील हा सामना शुक्रवारी संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. अशा परिस्थितीत, सामन्यापूर्वी, आम्ही येथे चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संभाव्य प्लेइंग 11, खेळपट्टीचा अहवाल आणि हवामान परिस्थितीबद्दल तुम्हाला माहिती देत आहोत.
चेन्नई आणि बंगळुरू यांच्यातील आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील 8 वा सामना चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. चेपॉकची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त मानली जाते. या खेळपट्टीवर फलंदाजी करणे जिकरीचे होऊन जाते. तज्ज्ञांच्या मते, चेंडू बॅटवर अडकतो, त्यामुळे फलंदाजांना शॉट्स मारणे अवघड होते.
एम चिदंबरम स्टेडियमच्या मैदानावर आतापर्यंत एकूण 78 आयपीएल सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 46 सामने आपल्या नावे केले आहेत, तर लक्षाचा पाठलाग करणाऱ्या संघाने 32 सामने जिंकले आहेत.
चेन्नईत शुक्रवारी ढगाळ वातावरण असणार आहे. कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच 10 टक्के पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. तर ताशी 21 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. मात्र, सामन्यादरम्यान पावसाची कोणतीही शक्यता वर्तवण्यात आलेली नाही.
हेही वाचा : SRH vs LSG : ‘या’ दोन खेळाडूंकडून काव्या मारनचा अपेक्षाभंग; सनरायझर्स हैदराबादच्या पराभवाला ठरले कारणीभूत…
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, फिल सॉल्ट, रजत पाटीदार, जितेश शर्मा (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, लियाम लिव्हिंगस्टोन, भुवनेश्वर कुमार, कृणाल पंड्या, टीम डेव्हिड, सुयश शर्मा, जोश हेजलवुड, मोहित राठी/स्वप्नील सिंग.
चेन्नई सुपर किंग्ज : रुतुराज गायकवाड (कर्णधार), शिवम दुबे, एमएस धोनी (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, सॅम कुरान, नूर अहमद, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, मथिसा पाथिराना, खलील अहमद.