काव्या मारन(फोटो- सोशल मीडिया)
SRH vs LSG : आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील 7 वा सामना 27 मार्च रोजी लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यामध्ये लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादचा 5 विकेट्सने दणदणीत पराभव केला. लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या हैदराबादने लखनौसमोर एकूण 191 धावांचे आव्हान ठेवले होते. ते लखनौ सुपर जायंट्स संघाने 16.1 षटकांत 5 विकेट्स राखून सहज पूर्ण केले.
सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2025 मधील पहिला सामना जिंकल्यानंतर दुसरा मात्र सामना गमावला आहे. गेल्या वर्षभरापासून सनरायझर्स संघाने आयपीएलमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. चाहत्यांना या संघाकडून मोठ्या धावसंख्येची सवय लागली आहे. एलएसजीविरुद्ध सनरायझर्स हैदराबादने उभारलेली 191 धावसंख्याही कमी नव्हती. तरी हैदराबादसारख्या खेळपट्टीवर हा संघ 200 हून अधिक धावा करण्यासाठी ओळखला जातो. आजवर आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा सर्वोच्च धावा उभारण्याचा विक्रम हा हैदराबाद संघाच्या नावे आहे. एलएसजीविरुद्धच्या पराभवाने सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारनचा अपेक्षाभंग झाला आहे. त्याबाबत आपण जाणून घेऊया.
सनराईजर्स हैदराबादच्या ताफ्यात अभिषेक शर्मासारखा स्फोटक फलंदाज आहे. गेल्या वर्षी त्याने आपल्या स्फोटक फलंदाजी शैलीने सर्वांना आश्चर्यचकित करून टाकले होते. मात्र, आयपीएल 2025 मधील झालेल्या दोन्ही सामन्यात अभिषेक शर्माची बॅट शांत दिसून आली. पहिल्या सामन्यात तो राजस्थानविरुद्ध 24 धावा करून लवकर बाद झाला होता. यानंतर एलएसजीविरुद्ध दुसऱ्या सामन्यात 6 चेंडूत 6 धावा करून तो शार्दुल ठाकूरचा शिकार ठरला. तर दुसरीकडे त्याचा सहकारी सलामीवीर फलंदाज ट्रॅव्हिस हेडने मात्र दोन्ही सामन्यात चांगली फलंदाजी केली आहे. त्याचवेळी अभिषेक शर्मा मात्र अपयशी ठरल्याचे दिसत आहे. कालच्या(दि. 27 मार्च) सामन्यात हैदराबादच्या पराभवाचे हे देखील एक कारण आहे. कारण अभिषेक 10 षटके जरी थांबला असता तर संघाची धावसंख्या 200 च्या पुढे जण्याची शक्यता होती.
सनराईजर्स हैदराबाद संघात स्टार गोलंदाज मोहम्मद शमी आहे. अशा वेळी संघाला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत आणि जेव्हा धावसंख्येचा बचाव करावा लागतो तेव्हा ही अपेक्षा अधिकच वाढलेलली दिसते. कालच्या(दि. 27 मार्च) सामन्यात हैदराबाद संघाने स्कोअर बोर्डवर 190 धावा लावल्या होत्या. यानंतर संघाला त्यांच्या वरिष्ठ गोलंदाजांकडून या धावसंख्येचा बचाव करण्याची मोठी अपेक्षा होती. मात्र मोहम्मद शमीसारखा गोलंदाज असून देखील संघाला धावसंख्येचा बचाव करण्यात अपयश आले. मोहम्मद शमीने एडन मार्करामला बाद केले तरी त्याने 3 षटकांत 37 धावा दिल्या आहेत.
सनरायझर्स हैदराबादची प्लेइंग 11 : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), नितीश रेड्डी, अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, मोहम्मद शमी आणि सिमरजित सिंह
लखनौ सुपर जायंट्सची प्लेइंग 11 : एडेन मार्कराम, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकिपर), अब्दुल समद, डेव्हिड मिलर, निकोलस पूरन, आयुष बदोनी, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, दिग्वेश राठी, आवेश खान