शार्दुल ठाकूर(फोटो-सोशल मीडिया)
Shardul Thakur : गेल्यावर्षी पार पडेलल्या आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये शार्दुल ठाकूर अनसोल्ड राहिला होता. नंतर लखनऊ सुपर जायंट्सने जखमी वेगवान गोलंदाज मोहसीन खानच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून त्याला आपल्या संघात सामील करून घेतले होते. अशा शार्दुल ठाकूरची सध्या जोरदार चर्चा होऊ लागली आहे. शार्दुल ठाकूरने टीम इंडियासाठी गोलंदाजीने आणि फलंदाजीने महत्वाची भूमिका बजावली आहे. तसेच त्याची आयपीएलमधील देखील कामगिरी समाधानकारक राहिली आहे. पण गेल्या मेगा ऑक्शनमध्ये तो अनसोल्ड राहिला होता. आता मात्र त्याने एलएसजीकडून आपले नाणे खणखणीत वाजवले आहे.
आयपीएलच्या 18 व्या हंगामातील 7 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यामध्ये लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादला पराभवाची धूळ चारली. लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता तर प्रथम फलंदाजी करत हैदराबादने लखनौसमोर एकूण 191 धावांचे आव्हान ठेवले होते. ते लखनौ सुपर जायंट्स संघाने 16.1 षटकांत 5 विकेट्स राखून सहज पूर्ण करून विजय संपादन केला. या सामन्यात लखनौचा स्टार गोलंदाज शार्दुल ठाकूरने आपल्या गोलंदाजीने चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. त्याने हैद्राबादच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडले होते. इतकेच नाही तर या सामन्यात त्याने एक मोठा पराक्रम देखील केला आहे. तसेच त्याने खास शतक देखील केले आहे.
हेही वाचा : SRH vs LSG : ‘या’ दोन खेळाडूंकडून काव्या मारनचा अपेक्षाभंग; सनरायझर्स हैदराबादच्या पराभवाला ठरले कारणीभूत…
शार्दुल ठाकूरने हैदराबादविरुद्ध चांगली गोलंदाजी करून आपल्याला ‘लॉर्ड शार्दुल ठाकूर’ का म्हणतात हे सिद्ध केले आहे. या सामन्यात त्याने 4 ओव्हरमध्ये 34 धावा देत 4 विकेट घेतल्या. या कामगिरीमुळे त्याने आयपीएलमधील 100 विकेट पूर्ण केल्या आहेत. त्याने 97 सामन्यांमध्ये ही कामगिरी करून दाखवली आहे.
दिल्ली कपिटल्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शार्दुल ठाकूरने एकाच षटकात दोन विकेट घेतल्या होत्या, त्याचा ट्रेंड हैदराबादविरुद्धही कायम राखला. गेल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या इशान किशनला शार्दुलने भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर त्याच षटकात अभिषेक शर्माला देखील त्याने बाद केले. या सामन्यात त्याने 4 विकेट घेत आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक 6 विकेट्स घेत पर्पल कॅपवरही कब्जा केला आहे.
सनरायझर्स हैदराबादची प्लेइंग 11 : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), नितीश रेड्डी, अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, हर्षल पटेल, पॅट कमिन्स (कर्णधार),मोहम्मद शमी आणि सिमरजित सिंह
लखनौ सुपर जायंट्सची प्लेइंग 11 : ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकिपर), एडेन मार्कराम, अब्दुल समद, डेव्हिड मिलर, निकोलस पूरन, आयुष बदोनी, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, दिग्वेश राठी