फोटो सौजन्य - mlcricketusa इंस्टाग्राम
लॉस एंजेलिस नाइट रायडर्स विरुद्ध वॉशिंग्टन फ्रीडम : अमेरिकेमध्ये सध्या मेजर क्रिकेट लीग सुरु आहे. १५ जुलै रोजी या लीगचा ११ वा सामना खेळवण्यात आला. हा सामना लॉस एंजेलिस नाइट रायडर्स (Los Angeles Knight Riders) विरुद्ध वॉशिंग्टन फ्रीडम (Washington Freedom) यांच्यात रंगला होता. या सामन्यांमध्ये वॉशिंग्टन फ्रीडमने या सामन्यांमध्ये विजय मिळवला. वॉशिंग्टन फ्रीडमचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडने संघासाठी दमदार फलंदाजी केली आहे. यामध्ये या दोघांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस केला. त्यामुळे चाहत्यांचे मनोरंजन झाले. या सामान्यांच्या दरम्यान एक अनोखी घटना झाली आणि ते पाहून सर्वच चकित झाले आहेत.
लॉस एंजेलिस नाइट रायडर्स विरुद्ध वॉशिंग्टन फ्रीडम सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाज आंद्रे रसेलने ट्रॅव्हिस हेडच्या दिशेने चेंडूं फेकला. बॉल मारताच ट्रॅव्हिस हेडच्या बॅटचे दोन तुकडे झाले आणि बॅट १० ते १५ फूट लांब फेकली गेली. या चेंडूवर हेडने जोरदार पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला, त्या चेंडू त्याच्या बॅटच्या वरच्या भागाला लागला आणि बॅटचे दोन तुकडे झाले. त्याचा एक भाग स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेने उडाला आणि दुसरा हेडच्या हातात राहिला. यादरम्यान, हेडची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती, परंतु त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि चेंडू मिडविकेटवर नेला.
या घटनेचा व्हिडीओ स्वतः मेजर क्रिकेट लीगच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ही घटना झाल्यानंतरही ट्रॅव्हिस हेडने दमदार फलंदाजी केली आणि त्याने ३२ चेंडूंमध्ये १६८.७५ स्ट्राईक रेटने ५४ धावांची शानदार खेळी खेळली. यामध्ये त्याने २ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश आहे. त्याचबरोबर वॉशिंग्टन फ्रीडमचा कर्णधार स्टीव्ह स्मिथसोबत पहिल्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी केली. हेड नवव्या षटकात बाद झाला असला तरी तोपर्यंत त्याने संघाला चांगल्या स्थितीत आणले होते.