
फोटो सौजन्य - AsianCricketCouncil सोशल मिडिया
India vs Pakistan U19 Asia Cup : आशियाई क्रिकेट कौन्सिल (ACC) पुरुष अंडर १९ आशिया कप २०२५ १२ डिसेंबरपासून सुरू होत आहे. आशियाई क्रिकेट कौन्सिल (ACC) पुरुष अंडर १९ या स्पर्धेचा भारताचा काल पहिला सामना पार पडला या सामन्यामध्ये भारताच्या संघाने यूएईविरुद्ध दमदार विजय मिळवला आणि पहिला विजय नावावर केला आहे. आता भारताचा पुढील सामना हा पाकिस्तानविरुद्ध खेळवला जाणार आहे. हा सामना भारताच्या संघासाठी महत्वाचा असणार आहे.
या स्पर्धेत आयुष म्हात्रे भारतीय संघाचे नेतृत्व करेल, तर विहान मल्होत्रा संघाचा उपकर्णधार असेल. या स्पर्धेत भारताचा सामना १४ डिसेंबर रोजी पाकिस्तानशी होईल. १६ डिसेंबर रोजी भारताचा सामना मलेशियाशी होईल. महत्त्वाचे म्हणजे, सर्व सामने सकाळी १०:३० वाजता सुरू होतील आणि टॉस सकाळी १० वाजता होईल. या स्पर्धेत आशियातील अव्वल आठ अंडर-१९ संघ सहभागी होतील.
आगामी आयसीसी पुरुष अंडर-१९ विश्वचषकाच्या तयारीसाठीही ही स्पर्धा महत्त्वाची मानली जाते. १४ डिसेंबर रोजी भारत आणि पाकिस्तानच्या अंडर-१९ संघांमधील सामना चाहते कुठे पाहू शकतात ते जाणून घेऊया. या सामन्यांची लाईव्ह स्ट्रिमिंग ही सोनी लिव्ह अॅपवर क्रिकेट चाहते पाहु शकतात. यासाठी तुम्हाला सोनी लिव्ह अॅपचे सबस्क्रिबशन असने गरजेचे आहे.
गट अ – भारत, पाकिस्तान, मलेशिया, युएई
गट ब: बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान, नेपाळ
The message is LOUD & CLEAR: We’re here to reclaim our crown 👑 🤩 Watch Vaibhav Sooryavanshi in action vs 🇵🇰 at the #DPWorldMensU19AsiaCup2025, on Dec 14, 10:30 AM, LIVE on Sony Sports Network TV channels & Sony LIV. #SonySportsNetwork #SonyLIV pic.twitter.com/pNXhfwra3Z — Sony Sports Network (@SonySportsNetwk) December 12, 2025