रशीद खान(फोटो-सोशल मीडिया)
UAE vs AFG: अफगाणिस्तानचा कर्णधार आणि स्टार रशीद खान हा सध्या जागतिक क्रिकेटमध्ये आपल्या फिरकीने सर्वांना चकित करत आहे. आता त्याने टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये एक नवा अध्याय लिहिला आहे. गोलंदाज रशीद खान टी-२० मध्ये इतिहास रचून सर्वाधिक विकेट्स घेण्याची किमया साधली आहे. त्याने तिरंगी मालिकेत यूएई विरुद्ध ही कामगिरी करून दाखवली आहे.
यूएई विरुद्धच्या त्रिकोणी मालिकेत अफगाणिस्तानचा कर्णधार आणि फिरकी गोलंदाज रशीद खानने ३ बळी टिपले. या दरम्यान त्याने चार षटकांमध्ये फक्त २१ धावा मोजल्या आहेत. या सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास तर या काळात अफगाणिस्तानने यूएईचा ३८ धावांनी दणदणीत पराभव केला.
हेही वाचा : UP T20 League : 4 प्लेऑफचे संघ पक्के! जाणून घ्या रिंकू सिंगची टीम कोणाविरुद्ध खेळणार?
रशीदने टिम साउदीला टाकले पिछाडीवर, रचला ‘हा’ इतिहास
अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज रशीद खान टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये १६५ विकेट्स घेऊन टी २० स्वरूपामध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने ९८ सामन्यात खेळून हा विश्वचषक विक्रम रचला आहे. या कामगिरीसह रशीदने न्यूझीलंडचा प्रसिद्ध गोलंदाज टिम साउदीला मागे टाकले आहे. टिम साउदीने एकूण १२६ टी-२० सामने खेळून १६४ बळी टिपले आहेत. टी-२० मध्ये सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत, न्यूझीलंडचा आणखी एक गोलंदाज ईश सोधी १२६ सामन्यांमध्ये १५० बळींसह या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. त्याच वेळी, बांगलादेशचा शकिब अल हसन हा चौथ्या स्थानी आहे.
सामन्याची परिस्थिती
जर आपण सामन्याबद्दल सांगायचे झाले तर, अफगाणिस्तान संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदान्त उतरला होता. यादरम्यान, त्याने २० षटकांत ४ विकेट गमावून यूएईसमोर १८८ धावांचा डोंगर उभा केला होता. अफगाणिस्तानकडून इब्राहिम झद्रानने सर्वाधिक ६३ धावा केल्या. अफगाणिस्तानने दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या यूएई संघाला २० षटकांत ८ विकेट गमावून १५० फक्त धावाच करता आल्या.
हेही वाचा : IPL मधून निवृत्त झाल्यानंतर R Ashwin आता या स्पर्धेत खेळणार? मिळणार करोडो रुपये…
यूएईच्या कर्णधाराकडून रोहित शर्माचा विक्रम मोडीत
अफगाणिस्तान आणि यूएई यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये आणखी एका विक्रमाला उद्ध्वस्त करण्यात आले आहे. खरं तर, यूएईचा कर्णधार आता टी२० मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. यादरम्यान, त्याने टीम इंडियाचा एकदिवसीय कर्णधार रोहित शर्माला पिछाडीवर टाकले आहे. आता मोहम्मद वसीमच्या नावे टी२० मध्ये एकूण ११० षटकार आहेत. यापूर्वी हा विक्रम टीम इंडियाचा एकदिवसीय कर्णधार रोहित शर्माच्या नावावर जमा होता. रोहित शर्माने टी२० मध्ये एकूण १०५ षटकार ठोकले आहेत. वसीमने अफगाणिस्तानविरुद्ध २ षटकार मारून रोहितचा विक्रम मोडीत काढला आहे.