
Bee attack in ongoing cricket match! Attempt to escape to save life fails, umpire dies on the field
Umpire dies in bee attack during cricket match: उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उन्नाव येथील सप्रू स्टेडियममध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान मधमाश्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात अनुभवी क्रिकेट पंच माणिक गुप्ता यांचा करुण अंत झाला आहे. कानपूर क्रिकेट सर्किटमधील माणिक हे एक प्रसिद्ध पंच होते आणि कानपूर क्रिकेट असोसिएशनशी देखील संबंधित राहिले होते. माणिक यांचे भाऊ अमित कुमार गुप्ता यांनी सांगितले की, सामन्यानंतर माणिक ड्रिंक्स ब्रेक दरम्यान सहकारी पंचांना भेटण्यासाठी गेले असता, मधमाशांच्या झुंडीने अचानक उपस्थित असलेल्या सर्वांवर हल्ला चढवला. पुढे त्यांनी सांगितले की, पळून जाण्याचा प्रयत्न करताना माणिकचा अचानक तोल गेला आणि तो खाली पडला आणि मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. माणिक हे जवळजवळ 30 वर्षांपासून पंचाचे काम करत होते आणि ते राज्य पॅनेल पंच होते.
अमित कुमार गुप्ता यांनी सांगितले की, “त्याचा सामना संपला होता आणि त्याचे सहकारी पंच वेगळ्या सामन्यात पंच म्हणून काम करत होते. ड्रिंक्स ब्रेक झाला तेव्हा, माणिक त्याच्याकडे गेला. ते दोघेही चहा पीत असताना, मागून मधमाशांचा एक थवा आला आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्वांवर त्यांनी हल्ला केला. मधमाशांपासून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना, त्याचा तो गेला आणि तो पडला. मधमाशांच्या संपूर्ण थव्याने त्याच्यावर हल्ला केला. मधमाशांनी इतरांवर देखील हल्ला केला.
अंपायर माणिक गुप्ता यांचे सहकारी पंच जगदीश शर्मा यांनी सांगितले की, “ड्रिंक्स ब्रेक दरम्यान, मधमाशांच्या एका थव्याने आमच्यावर हल्ला चढवला. जेव्हा सर्वजण जमिनीवर पडले होते, तेव्हा मधमाश्यांनी तिथे उपस्थित असलेल्या सर्वांवर हल्ला केला. माणिकवर क्रूर हल्ला झाला.”
अंपायर माणिक गुप्ता यांचे असणारे शेजारी भारतेन्दु पुरी म्हणाले की, “माणिक गुप्ता यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य पंच म्हणून आणि त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी समर्पित केले होते.” भारतेन्दु पुरी यांनी त्यांनी गुप्ता यांचे क्रिकेटसाठी पूर्णपणे समर्पित म्हणून वर्णन केले, तसेच त्यांनी या घटनेला दुर्दैवी. ते एक प्रसिद्ध पंच आणि कानपूर(उत्तर प्रदेश) क्रिकेट असोसिएशनचे सदस्य होते.